2026 Long Weekends : 2026 मधल्या लॉंग वीकेंडची लिस्ट पाहिली का? वाचा आणि करा ट्रिपचे प्लॅनिंग

नवीन वर्ष 2026 हे ट्रॅव्हलप्रेमींसाठी खास असणार आहे. 2026 या वर्षात अनेक सार्वजनिक सुट्ट्या येत असल्याने स्मार्ट प्लॅनिंग करून तुम्ही लॉंग वीकेंडचा प्लान करू शकता. या प्लॅनिंगमुळे कामाच्या धावपळीतून थोडा ब्रेक घेऊन नवीन ठिकाणे एक्सप्लोर करता येतील फक्त गरज असणार आहे योग्य प्लॅनिंगची.. चला जाणून घेऊयात 2026 मधील महत्त्वाचे लॉंग वीकेंड्सची संपूर्ण यादी.

जानेवारी –

नवीन वर्षाच्या दिवशी कार्यालये सहसा 1 तारखेला बंद असतात. 1 तारखेला गुरूवार आहे. तर 3 आणि 4 तारखेला अनुक्रमे शनिवार आणि रविवार आहेत. त्यामुळे जानेवारी महिन्यात 1 ते 4 अशी सुट्टी घेता येईल. याशिवाय 26 जानेवारीला सोमवार असल्याने त्याआधीचा रविवार अशी दोन दिवसांची सुट्टी घेता येईल.

मार्च –

1 ते 3 मार्च अशी सुट्टी घेता येईल. 2 मार्चला होळी आहे आणि 3 मार्चला धुलिवंदन. त्यामुळे 1 ते 3 मार्च अशी सुट्टी घेता येईल. त्यानंतर 21 मार्च शनिवारी ईद आणि त्यानंतर रविवार अशी सुट्टी असेल. मार्चमध्ये आणखी एक लॉन्ग विकेंड ट्रिप प्लॅन करता येईल. 26 ते 31 मार्च पर्यंत. 26 तारखेला राम नवमी आहे, 27 ला एक दिवस सुट्टी घ्या, 28-29 चा वीकेंड, त्यानंतर 30 ला पुन्हा एक सुट्टी घ्या आणि सोमवारी 31 तारखेला महावीर जयंतीची सुट्टी असेल. असा तुम्हाला एका आठवड्याचा मोठा ब्रेक मिळू शकतो.

एप्रिल –

3 एप्रिल शुक्रवारी गुड फ्रायडे आणि त्यानंतर 4 ते 5 तारखेला शनिवार, रविवार अशी सुट्टी घेता येईल.

मध्ये –

मे महिन्यात 1 ते 3 मे अशी सुट्टी घेता येईल. 1 मे शुक्रवारी महाराष्ट्र दिनाची सुट्टी आणि त्यानंतर शनिवार, रविवार.

जून –

26 ते 28 जून असा लॉंग वीकेंडचा प्लॅन आखता येईल. 26 तारखेला शुक्रवार मोहरमची सुट्टी आणि त्यानंतर शनिवार, रविवार सुट्टी घेता येईल.

ऑगस्ट –

28 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनामुळे लाँग वीकेंड मिळतो. 27 ला नारळी पौर्णिमा, 26 ला ईदची सुट्टी. त्यानंतर 29 ऑगस्ट शनिवार आणि 30 ऑगस्ट रोजी रविवार अशा सुट्ट्या घेता येतील.

सप्टेंबर –

सप्टेंबरमध्ये 4 तारखेला शुक्रवार जन्माष्टमीची सुट्टी घ्या आणि नंतर 5-6 वीकेंड आहे.

ऑक्टोबर –

शुक्रवारी 2 तारखेला गांधी जयंती आहे आणि त्यानंतर 3-4 वीकेंड आहे. फॅमिलीसोबत फिरण्याचा प्लॅन नक्कीच करता येईल.

नोव्हेंबर –

8 ते 11 अशी सुट्टी घेता येईल. 8 ला दिवाळी आणि 11 ला भाऊबीज. मध्ये 9, 10 अशी सुट्टी घ्यावी लागेल.

डिसेंबर –

25 तारखेला शुक्रवारी ख्रिसमसची सुट्टी आहे आणि त्यानंतर 26-27 वीकेंड आहे.

2026 हे वर्ष प्रवासासाठी योग्य आहे. यामध्ये अशा अनेक सुट्ट्या आहेत, ज्यात तुम्ही एक दिवस सुट्टी घेऊन लांब ट्रिपची योजना आखू शकता.

हेही वाचा – Google Doodle :नववर्षाच्या स्वागतासाठी गुगलचा खास डूडल, पार्टी थीममधून 2026 चे आगमन

Comments are closed.