January 2026 : नववर्षाच्या पहिल्या महिन्यातील व्रत-उत्सवांची संपूर्ण यादी !
दरवर्षीप्रमाणे 2026 मधील जानेवारी महिना हा धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा असणार आहे. या महिन्यात सूर्य देवाच्या उपासनेचा ‘मकर संक्राती’ हा सर्वात मोठा सण आहे. भारतात ‘मकर संक्रात’ मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. जानेवारीमध्ये संक्रातीव्यतिरीक्त पितरांच्या आशीर्वादासाठी महत्त्वाची असणारी ‘मौनी अमावस्या देखील’ आहे. या दोन सणांव्यतिरीक्त जानेवारी कोणते सण- उत्सव आहेत जाणून घेऊयात.
3 जानेवारीपासून माघ महिन्याला सुरूवात –
माघ महिना हा अत्यंत पवित्र आहे. या महिन्याची सुरुवात 3 जानेवारीपासून सुरु होईल आणि 1 फेब्रुवारी 2026 ला माघ पूर्णिमेने या महिन्याची समाप्ती होईल. या महिन्यात गंगा स्नान करणे, जप करणे, व्रत करणे शुभ परिणाम देणारे आहे.
जानेवारी महिन्यातील सण –
मकर संक्रात –
जानेवारी 2026 मध्ये 14 जानेवारी रोजी ‘मकर संक्रात’ आहे. सूर्य देवाच्या पूजेसाठी आणि दानासाठी संक्रातीचा दिवस सर्वात उत्तम असतो. या दिवशी सूर्य धनु राशीतून बाहेर पडून मकर राशीत प्रवेश करतो, ज्याला ‘उत्तरायण’ असेही म्हणतात.
मौनी अमावस्या –
जानेवारी 2026 मध्ये 18 जानेवारी येणारी ‘मौनी अमावस्या’ आहे. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी मौन पाळून साधना करणाऱ्या व्यक्तीला अक्षय पुण्य मिळते. तसेच मौनी अमावस्या व्रत केल्याने पितरांच्या मुक्तीसाठी आणि त्यांच्या आशीर्वादासाठी लाभदायी असते.
माघ गुप्त नवरात्री –
देवी दुर्गेच्या 10 विद्यांची म्हणजे दशमहाविद्यांची साधना करण्यासाठी हा सण असतो. यावर्षी माघ गुप्त नवरात्री 19 जानेवारीला सुरू होईल आणि 28 जानेवारी 2026 पर्यंत चालेल.
वसंत पंचमी –
सरस्वतीची देवीची पूजा करण्याचा दिवस म्हणजे वसंत पंचमी. या सण यावर्षी 23 जानेवारीला साजरा केला जाईल. असे म्हणतात की या दिवशी सरस्वतीची पूजा केल्याने बुद्धी आणि ज्ञानाचा आशीर्वाद मिळतो.
- 1 जानेवारी 2026 -प्रदोष व्रत
- 3 जानेवारी 2026 – प्रौष पौर्णिमा
- 6 जानेवारी 2026 – चतुर्थी
- 14 जानेवारी 2026 – मकर संक्रांती
- 16 जानेवारी 2026 – मासिक शिवरात्री
- 18 जानेवारी 2026 – मौनी अमावस्या
- 23 जानेवारी 2026 – वसंत पंचमी
- 25 जानेवारी 2026 – रथसप्तमी
- 26 जानेवारी 2026 – भीष्माष्टमी
- 29 जानेवारी 2026 – जया एकादशी
- 30 जानेवारी 2026 – प्रदोष व्रत
हेही वाचा – New Year 2026 : देवदर्शनाने करा नववर्षाची सुरुवात, वाचा महाराष्ट्रातील प्रसिद्ध मंदिराची यादी
Comments are closed.