Smartphone Addiction : कुटूंबाच्या बॉंडिगमध्ये अडथळा ठरतोय मोबाईल?
मोबाईल जीवनाचा एक भाग झाला आहे. त्यामुळे लहान ते मोठे सर्व वयोगटातील लोकांच्या हातात मोबाईल दिसत आहे. मोबाईल ही सध्या चैनीची वस्तू न राहता गरजेची वस्तू झाली असली तरी त्याचा अतिवापर आरोग्यासाठी हानिकारक असतो. त्यामुळे मुलांच्या हातात मोबाईल देताना वेळमर्यादा निश्चित असणे आवश्यक आहे असा सल्ला तज्ज्ञ देतात. मोबाईलचे व्यसन बरं नाही असं म्हणत पालक मुलांच्या हातून मोबाईल अक्षरश: काढून घेतात. परंतू ते स्वत:रात्री उशिरापर्यंत रील पाहतानाचे चित्र अनेक घरात दिसते.
सध्या सर्व वयोगटातील लोक डिजिटल नैराश्याला बळी पडत आहेत. ही सवय त्यांच्या मानसिक-शारीरिक आरोग्यावर परिणाम करतेय शिवाय कौटुंबिक नातेसंबंधानाही पोकळ बनवत आहे. आज आपण जाणून घेऊयात कुटूंबाच्या बॉंडिगमध्ये मोबाईल कशा प्रकारे अडथळा ठरत आहे.
मानसोपचारतज्ज्ञांच्या मते पालक मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असले तरी ते स्वत: मोबाईल व्यसनाला बळी पडत आहेत. मुले पालकांचे अनुकरण करतात हे पालकांनी लक्षात घ्यायला हवे. मुले जे घरी पाहतात तेच शिकतात म्हणून, जेव्हा पालक मुलांना स्क्रीनला चिकटलेले पाहतात तेव्हा मुले देखील तशीच वागतात. अशावेळी पालंकानी ‘नो फोन डे’ अशा काही धोरणांचा अवलंब करायला हवा.
हेही वाचा – New Year’s Resolutions : नवीन वर्षाचे संकल्प का होतात फेल ?
बॉंडिगमध्ये अडथळा ठरतोय मोबाईल
संवादात अडथळे – पालकांसह मुलेही मोबाईलमध्ये गुंतल्याने कुटूंबात संवाद होत नाही. घरातल्या घरातही अनेकजण मेसेजवर बोलतात, ज्यामुळे प्रत्यक्ष बोलणे होत नाही. प्रत्यक्ष बोलण्याऐवजी फोनवर अवलंबून राहिल्याने संवाद तुटतो आणि गैरसमज वाढतात.
दुर्लक्ष – सोबत असतानाही फोनमध्ये गुंतून राहणे सदस्यांना दुर्लक्षित वाटायला लागते.
अविश्वास – मुले सतत फोनमध्ये असतील तर संशय आणि अविश्वास निर्माण होऊ शकतो. पालकांना मुले काही चुकीचे करत आहेत का अशी भिती वाटू लागते. यावरून वाद होतात आणि नात्यात कटूता निर्माण होते.
भावनिक दुरावा – प्रत्यक्ष वेळ न दिल्याने भावनिक संबंध कमकुवत होतात.
एकटेपणा – समाजमाध्यमांवर कितीही लोकांशी कनेक्टेड असलो तरी, प्रत्यक्षात कुटुंबात एकटेपणा जाणवतो.
हेही वाचा – मुलांसाठी व्हिलेज टूरही महत्वाची
Comments are closed.