Open Pores Remedies: चेहऱ्यावरचे खड्डे बुजवण्यासाठी घरगुती उपाय
आजकाल अनेकांना पिंपल्स झाल्यानंतर चेहऱ्यावर खड्डे पडतात. हे खड्डे सौंदर्यावर परिणाम करतात आणि आत्मविश्वास कमी करतात. पूर्णपणे खड्डे नाहीसे होण्यासाठी वेळ लागतो, पण काही घरगुती उपायांनी त्वचा सुधारण्यास मदत होते.
1) कोरफड
कोरफड त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. रोज कोरफड लावल्याने त्वचा मऊ आणि तजेलदार होते. ताजे कोरफडीचे जेल चेहऱ्यावर लावा आणि 15 ते 20 मिनिटांनी चेहरा धुवा हे फार फायदेशी आहे.
2) मध
मधामध्ये जंतुनाशक गुणधर्म असतात. शुद्ध मध चेहऱ्यावरील खड्डे असलेल्या जागेवर लावा आणि 10 ते 15 मिनिटांनी कोमट पाण्याने धुवा. हा उपाय आठवड्यातून 3 ते 4 वेळा करा. हे देखील फार फायदेशीर ठरू शकतं.
3) हळद आणि दही
1 चमचा दही त्यात चिमूटभर हळद मिसळा. हा फेस पॅक चेहऱ्यावर लावून 15 मिनिटांनी धुवा. हा उपाय आठवड्यातून 2 वेळा पुरेसे आहे.
4) पाणी आणि आहार
दिवसाला भरपूर पाणी प्या. फळे, भाज्या आणि घरगुती पौष्टिक आहार घ्या. तेलकट आणि जंक फूड टाळाचं आणि चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावत जा.
5) पुरेशी झोप
पुरेशी झोप घेण्याची सवय लावा, व्यायाम झाल्यानंतर चेहरा नीट स्वच्छ ठेवा आणि उगाचच हात चेहऱ्यावर लावणे टाळा. अशा छोट्या पण महत्त्वाच्या सवयी नियमितपणे पाळल्यास त्वचा निरोगी राहते तसेच रोमछिद्रे कमी दिसण्यास मदत होते.
चेहऱ्यावरचे खड्डे कमी होण्यासाठी घरगुती उपाय उपयुक्त ठरू शकतात. नियमित काळजी, स्वच्छता आणि योग्य आहार यामुळे त्वचेचा पोत सुधारतो. नैसर्गिक उपायांनी हळूहळू फरक दिसून येतो.
हेही वाचा : Dry Skin Care : कोरड्या त्वचेमुळे त्रस्त आहात? आजच फॉलो करा हे रुटीन
Comments are closed.