Vastu Tips : ही झाडे घरात चुकूनही लावू नयेत, आर्थिक चणचणीत पडेल भर
घरात झाडे लावणे आरोग्याच्यादृष्टीने फायदेशीर आहे, वास्तुशास्त्रामतेही हे शुभ मानले जाते. पण, काही झाडे सकारात्मक उर्जा देतात तर काही झाडांमधून नकारात्मक ऊर्जा मिळते. अशी नकारात्मकता वाढवणारी झाडे घरातवास्तूदोष निर्माण करतात. घरात नकारात्मक ऊर्जा वाढल्यास तसेच वास्तुदोष उत्पन्न झाल्यास आर्थिक अडचणी सुरु होतात. त्यामुळे घरात झाडे ठेवताना योग्य ती काळजी घ्यायला हवी. आज आपण घरात कोणती झाडे ठेवावीत आणि कोणती ठेवू नयेत याविषयी जाणून घेऊयात.
काटेरी झाडे आरोग्यासाठी हानिकारक असतात. त्याचप्रमाणे ही झाडे आर्थिक स्थितीवर देखील प्रभाव करतात. त्यामुळे घरात अशी झाडे लावू नयेत. अनेकांना घरात निवडुंगाचे झाड शोपीस म्हणून ठेवण्याची सवय असते मात्र निवडुंगाचे झाड घरात नकारात्मक उर्जा निर्माण करते असे म्हणतात. यामुळे आर्थिक स्थितीवर परिणाम होऊ शकतो. याशिवाय घरासमोर पिंपळाचे झाड नसावे, असे सुद्धा सांगितले जाते. कारण घराजवळ पिंपळाचे झाड असल्यास पैशाची कमतरता जाणवते.
हेही वाचा – Faith And Superstition : श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात फरक काय?
घरात कोणती झाडे ठेवावीत?
अशोक –
घराबाहेर अशोकाचे झाड असणे शुभ असते. यामुळे याने घरात संपन्नता येते आणि कुटूंबातील नातेसंबंध सुधारतात.
तुळस –
तुळशीचे रोपटे घरात असायलाच हवे. शास्त्रामते अंगणात तुळशीचे रोप असणे शुभ परिणाम देते पण मुंबईसारख्या ठिकाणी घरासमोर अंगण असणे खूप कठीण गोष्ट आहे. त्यामुळे खिडकीत तुम्ही लावू शकता. तुळसीला लक्ष्मी देवीसमान मानले जाते. तुळस नेहमी पूर्व – उत्तर दिशेला ठेवावे. या रोपामुळे नकारात्मकता दूर होते.
मनी प्लांट –
घरात मनी प्लांटची एक वेल तरी असावी. मनी प्लांटमुळे आर्थिक स्थिती सुधारते. दक्षिण – पूर्व किंवा उत्तर दिशेला मनी प्लांट लावावे. मनी प्लांट लावल्याने घरात लक्ष्मीची कृपा राहते असे म्हणतात.
हेही वाचा – Home Vastu Tips : घर कसे असावे? कोणत्या दिशेला काय असावे जाणून घ्या
Comments are closed.