मकर संकृती वदेस 2026: सुवासिनी स्टारके ; घायट, बाजेट फ्रेनेडल आयडीएच येथे शिका
हिंदू धर्मात ‘मकर संक्रात’ हा महत्वाचा सण आहे. वर्षाचा पहिला सण मकर संक्रात असतो. हा सण सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा साजरा केला जातो. या दिवशी दानधर्म, स्नान आणि पूजा करणे याला विशेष महत्त्व आहे. या सणानिमित्त सुगड पुजण्यापासून पुढील १५ दिवस हळदी कुंकवाचे कार्यक्रम सुरू होतात. हळदी- कुंकवाच्या कार्यक्रमात एकमेकांना वाण देण्याची प्रथा असते. यंदा तुम्हाला वाण काय द्यायचे हा प्रश्न पडला असेल तर काही बजेट फ्रेंडली वस्तू तुम्ही घेऊ शकता. ( Unique And Budget Friendly Vaan Ideas For Makar Sankranti 2026 )
तुळशीचे रोप
तुळस ही सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानली जाते. त्यामुळे तुम्ही हळदीकुंकवाचं वाण म्हणून तुळशीचं रोप देणे हा चांगला पर्याय आहे.
नाणे पर्स
बहुतेकदा महिलांना बाहेर जाताना सुट्टे पैसे लागतात. त्यासाठी तुम्ही सुवासिनींना लहान कॉइन पर्स देऊ शकता. जेणेकरून बाहेर जाताना या पर्समध्ये सुट्टे पैसे कॅरी करणे सोपे जाते.
पाककृती पुस्तक
महिलांना स्वयंपाक करताना उपयोगी पडणारे रेसिपी बुक तुम्ही वाण म्हणून देऊ शकता.
रुमाल
हातरूमाल ही तर प्रत्येक महिलेला दैनंदिन जीवनात लागणारी वस्तू आहे. १० रूपयांमध्ये हात रूमालाचे अनेक चांगले प्रकार बाजारात मिळतात. त्यामुळे वाणासाठी हातरुमाल चांगले पर्याय ठरतात.
दोऱ्याचं रिळ
सुई आणि दोरा या दोन गोष्टी प्रत्येक घरात लागतात. एक दोऱ्याचं रिळ साधारण ३ ते ४ रूपयांना मिळते. १० रूपयांत २ ते ३ रिळ तुम्ही खरेदी करू शकता.
पाण्याच्या बॉटल्स
यंदाच्या मकरसंक्रांतीसाठी तुम्ही महिलांना पाणी पिण्याच्या बॉटल्सही देऊ शकता. तुम्हाला स्वस्तात पाण्याच्या बॉटल्स बाजारात मिळतात.
साडी कव्हर
साडी कव्हर हे देखील वाण देण्यासाठी चांगले पर्याय ठरतात. तुम्ही होलसेलमध्ये साडी कव्हर घेऊ शकता. मार्केटमध्ये २०- ३० रुपयांपासून हे साडी कव्हर मिळतात.
सजावटीचे दिवे
बाजारात आकर्षक आणि सुंदर सजावटीचे दिवे मिळतात. ते बजेट फ्रेंडली देखील असतात. तुम्ही हे दिवे वाणात देऊ शकता. तुम्हाला सुमारे ५० रुपयांपासून हे दिवे मिळतात.
कापडाच्या पिशव्या
प्लॅस्टिकवर बंदी असल्यामुळे तुम्ही कापडाच्या पिशव्या वाण म्हणून देऊ शकता.
भांडी
अनेक महिला स्वयंपाक घरातील वस्तू वाणात देतात. यामध्ये छोटा पेला, चमचा, किंवा मोठी प्लेट यासारखे भांडे वाणात देऊ शकतात. कारण ते कधी ना कधी उपयोगात येतात.
पॉकेट आरसा
महिलांना प्रत्येक वेळी तयारी करताना आरसा लागतो. अशावेळी बाहेर गेल्यावर पॉकेट आरशाचा उपयोग होतो. त्यामुळे महिलांना तुम्ही पॉकेट आरसा वाण म्हणून देऊ शकता.
तोरण
वाण देण्यासाठी तोरण चांगला पर्याय आहे. प्रत्येकाच्या घरी दाराला तोरण लावले जाते. बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे तोरण मिळतात.
हेही वाचा: Makar Sankranti : बाळाच्या बोरन्हाणाची अशी करा तयारी
Comments are closed.