मकर संक्रांती : ए?

इंग्रजी नववर्षाचा पहिला सण मकर संक्रात असतो. यंदा 14 जानेवारी रोजी मकर संक्रातीचा सण साजरा होत आहे. संक्रातीला आकाशात पंतगबाजी करण्यात येते, तिळगुळाचे लाडू देत एकमेकांना शुभेच्छा देण्यात येतात. घराघरात तिळगुळाच्या लाडूचा सुंगध दरवळत आहे. संक्रातीला तिळगुळ देण्याची प्रथा आहे. पण तिळगुळाचेचं लाडूचं का? रवा, बेसन आदी लाडू का नाहीत? तिळाचे पदार्थंच का खावेत?

पौराणिक कथेनुसार, एकदा भगवान सूर्य आपला मुलगा शनिदेवावर कोपले होते. रागाच्या भरात त्यांनी आपल्या शक्तीने शनिदेवाचे कुंभ राशीत असलेले घर जाळले. यानंतर शनिदेवाने वडिलांची माफी मागितली. तेव्हा भगवान सूर्याचा राग शांत झाला. भगवान सूर्याने शनिदेवाला सांगितले की जेव्हाही ते मकर राशीत प्रवेश करतील तेव्हा ते घर धन आणि सुखाने भरून जाईल. मकर राशीला शनिदेवाचे दुसरे घर मानले जाते. यानंतर भगवान सूर्य जेव्हा शनिदेवाच्या मकर राशीत आले तेव्हा पुत्राने आपल्या वडिलांची तीळ आणि गुळाने पूजा केली आणि त्यांनी वडिलांना तीळ आणि गूळ खायला दिले.

हेही वाचा – Tilgul : संक्रातीला पोटभर तिळगुळ खा आणि आरोग्य सुदृढ ठेवा

शनिदेवानं तिळगूळ देण्यामागे देखील कारण आहे. कारण कुंभ राशीतील शनिचं घर जाळल्यानंतर शनिदेवाकडे सूर्यदेवाला देण्यासाठी काहीच शिल्लक नव्हते. त्यामुळेच शनिने जेव्हा तिळगूळाचे दान दिले तेव्हा सूर्यदेव आनंदी झाले. यानंतर ते म्हणाले की जो कोणी मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ आणि गुळाने त्यांची पूजा करेल त्याला शनिदेव आणि इतर देवांचाही आशीर्वाद मिळेल. त्यामुळेच मकर संक्रांतीला तिळाचे लाडू बनवून खाण्याची परंपरा आहे.

शास्त्रीय कारण

मकर संक्रांत हा सण हिवाळ्यात येतो. या सणाच्या वेळी वातावरणातील थंडावा असतो. अशा परिस्थितीत शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी तिळगूळ उपयुक्त ठरतं.तीळ आणि गूळ हे उष्णतावर्धक पदार्थ म्हणून ओळखले जातात. हिवाळ्यात तिळगूळाचे लाडू तयार करून खाल्ल्यास शरीरातील ऊर्जेची कमतरता भरून निघते. म्हणून मकर संक्रांतीला तिळगूळाचे लाडू खाण्याला विशेष महत्त्व आहे.

हेही वाचा – Makar Sankranti Sugad Puja Vidhi 2026: मकर संक्रांतीला सुगड पूजा कशी करावी? जाणून घ्या

Comments are closed.