Cotton Saree : कॉटनची साडी नेसल्यावर फुगते? वापरा हे हॅक, मिळेल एलिगंट लूक

वजनाने हलकी आणि दिसायल डिसेंट लूक देत असल्याने आपल्यापैकी प्रत्येकीच्या कपाटात किमान एक-दोन साड्या कॉटनच्या असतातच. ऑफिसवेअरसाठी या साड्या परफेक्ट ऑप्शन असतात. मात्र, कॉटनची साडी नेसताना एक गोष्ट डोकेदुखी ठरते, ती म्हणजे साडी फुगण्याची. ही साडी दिसायला जितकी सुंदर असते तितकीच ती नीट बसवणे कठीण असते. अनेकदा निऱ्या बसत नाही किंवा कमरेला फुगते. आज आपण कॉटन साडी फुगू नये यासाठी काही खास टिप्स पाहूयात.

  • साडी पहिल्यांदा धुताना मिठाच्या पाण्यात भिजवा. यामुळे रंग पक्का होतो आणि फॅब्रिक मऊ होऊन साडी उत्तम बसते.
  • साडी नेसण्यापूर्वी व्यवस्थित इस्त्री करणे गरजेचे असते, विशेष करुन काठ आणि पदरला कडक इस्त्री करावी.
  • कॉटनची साडी नेसताना जास्त निऱ्या काढू नये. ५ ते ६ निऱ्या पुरेशा असतात.
  • कॉटनसाडीला अधिक निऱ्या काढल्यास साडी कंबरेजवळ फुगीर होते.
  • निऱ्या खोचताना बेंबीच्या किचिंत वर खोचाव्यात. पोट जास्त असेल तर बेंबीच्या डावीकडे खोचाव्यात.

  • प्लेन कॉटन साडीवर प्रिंटेड किंवा क्रॉन्टास्ट ब्लाउज घालावे. यामुळे लक्ष फुगलेल्या साडीवर जात नाही आणि लूकही एलिगंट मिळतो
  • बॉडी शेपर पेटीकोटचा वापर कॉटन साडीत करावा. यामुळे साडी चापून-चोपून बसते.
  • साडी पहिल्यांदा धुताना मिठाच्या पाण्यात भिजवा. यामुळे रंग पक्का होतो आणि फॅब्रिक मऊ होऊन साडी उत्तम बसते.
  • या सोप्या टिप्स फॉलो केल्यास कॉटन साडी फुगणार नाही, उलट एलिगंट लूक मिळेल.

हेही वाचा – Travel Outfits For Women: ट्रॅव्हल करताना घाला ‘हे’ आऊटफिट्स; वाटेल कम्फर्टेबल

Comments are closed.