Kids Health Tips: 3 ते 12 वयोगटातील मुलांना चुकूनही देऊ नयेत ‘हे’ पदार्थ
मुलांचा योग्य विकास होण्यासाठी त्यांना योग्य पोषण मिळणे गरजेचे आहे. पालकांना आपले मूल निरोगी असावे असे वाटते. पण अनेकदा नकळत पालक काही पदार्थ मुलांना खायला देतात. हे पदार्थ मुलांच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. मुलांचा विकास हा १२ वर्षांपर्यंत होत असतो. त्यामुळे या वयोगटातील मुलांना काही पदार्थ देणे टाळावे.
चहा आणि बिस्किटे
मुलांना सकाळची सुरुवातच चहा- बिस्कीटने करण्याची सवय असते. अगदी शाळेत जाताना सुद्धा मुले चहा,बिस्कीट खातात. मात्र मुलांसाठी ते हानिकारक असू शकते. यामुळे त्यांची पचनसंस्था कमकुवत होते आणि पोटाशी संबंधित समस्या वाढतात. त्याऐवजी, सकाळी त्यांना ४-५ भिजवलेले बदाम आणि दूध देऊ शकता.
नूडल्स, पास्ता, पिझ्झा, बर्गर
३ ते १२ वयोगटातील अनेक मुलांना नूडल्स, पास्ता, पिझ्झा आणि बर्गरसारख्या जंक फूडची सवय लागते. या पदार्थांमुळे तात्पुरते पोट भरते. पण या पदार्थांमुळे शरीराला पोषक तत्वे मिळत नाही. यामुळे मुलांमध्ये थकवा, लठ्ठपणा आणि चिडचिड वाढते.
कोल्ड्रिंक्स, केक आणि पेस्ट्री
पालकांनी ३ ते १२ वयोगटातील मुलांना जास्त प्रमाणात कोल्ड्रिंक्स, केक आणि पेस्ट्री देणे टाळावे. या पदार्थांमध्ये साखर आणि वाईट चरबी जास्त असते, ज्यामुळे मुलांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. याचे नियमित सेवन केल्याने लठ्ठपणा वाढतो आणि टाइप २ मधुमेहासारख्या गंभीर आजारांचा धोका असतो.
हेही वाचा: Child Mental Health: आई- वडिलांच्या ‘या’ सवयींमुळे बिघडते मुलांचे मानसिक आरोग्य
Comments are closed.