Liquid Blush VS Powder Blush: लिक्विड की पावडर ब्लश? तुमच्या त्वचेसाठी काय सर्वोत्तम?

गालावर ब्लश लावल्याशिवाय मेकअप पूर्ण होत नाही. ब्लश लावल्याने फ्रेश लूक मिळतो. ब्लशचे दोन प्रकार असतात. लिक्विड आणि पावडर ब्लश, पण यापैकी कोणता ब्लश त्वचेसाठी चांगला असतो हा प्रश्न पडतो. चला तर मग जाणून घेऊया लिक्विड आणि पावडर ब्लशपैकी काय चांगले असते? ( Liquid Blush VS Powder Blush; Which Is Good For Skin? )

द्रव लाली
लिक्विड ब्लश हा त्वचेवर सहज ब्लेंड होतो आणि अतिशय नैसर्गिक, फ्रेश लूक देतो. जर तुम्हाला कमी मेकअपची आवड असेल लिक्विड ब्लश चांगला पर्याय ठरतो. विशेषतः ज्यांची त्वचा कोरडी आहे त्यांच्यासाठी हा ब्लश फायदेशीर ठरतो. कारण लिक्विड ब्लशमुळे त्वचा हायड्रेटेड राहते. मात्र तुमची त्वचा जर तेलकट असेल तर लिक्विड ब्लश लावणे टाळा. लिक्विड ब्लश तेलकट त्वचेवर टिकत नाही आणि नंतर चेहऱ्यावर पसरतो.

पावडर ब्लश
पावडर ब्लश हा लॉन्ग लास्टिंग असतो. ज्यांची त्वचा तेलकट आहे त्यांच्यासाठी हा ब्लश चांगला ठरतो. पावडर ब्लश हा खास कार्यक्रम, पार्टीसाठी परिपूर्ण आहे. मात्र कोरड्या त्वचेवर हा ब्लश लावण्यापूर्वी त्वचेला पूर्णपणे मॉइश्चरायझ करणे महत्वाचे आहे.

तुमच्यासाठी कोणता चांगला आहे?
जर तुमची त्वचा कोरडी किंवा सामान्य असेल आणि तुम्हाला नैसर्गिक फिनिशसाठी लिक्विड ब्लश हा एक चांगला पर्याय ठरेल. याउलट जर तुमची त्वचा तेलकट असेल आणि तुम्हाला मॅट लूक हवा असेल तर पावडर ब्लश हा एक चांगला पर्याय आहे. विशेष प्रसंगी तुम्ही दोन्ही ब्लेंड करू शकता, ज्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते. यानुसार तुम्ही तुमच्या त्वचेप्रमाणे योग्य ब्लश निवडू शकता.

Comments are closed.