Health Tips: पाणी पिताना ‘या’ चुका ठरतात घातक; ९०% लोकांना माहित नाही कारण
पाणी हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. सामान्यतः एका प्रौढ व्यक्तीने दिवसातून २.५ ते ३.५ लिटर (सुमारे ८ ते १२ ग्लास) पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. मात्र पाणी पिताना देखील काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. पाणी पिताना ९०% लोकं नकळत काही चुका करतात, ज्यामुळे आरोग्यावर परिणाम होतो. पोषणतज्ञांनी याबाबत महत्त्वाचा सल्ला दिला आहे. ( Avoid these mistakes while drinking water )
पटपट पाणी पिणे
बऱ्याच जणांना एकाच श्वासात पटपट पाणी पिण्याची सवय असते. पण पोषणतज्ञांच्या मते, असे केल्याने हे पाणी पचवण्यास शरीराला अडचण येते. शरीराला मिनी शॉक बसतो. ज्यामुळे पोटफुगी किंवा आम्लतासारख्या पचन समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे पाणी पिताना नेहमी २-३ सेकंद गॅप घेऊन प्यावे. यामुळे शरीरावर अतिरिक्त ताण येत नाही.
तापमान
अनेकांना थेट थंड फ्रिजमधलं किंवा गरम पाणी पिण्याची सवय असते. पण अति थंड किंवा गरम पाण्याच्या तापमानाशी जुळवून घेण्यासाठी शरीराला अतिरिक्त ऊर्जा खर्च करावी लागते. त्यामुळे पाणी नेहमी सामान्य तपमानात प्यावे.
जेवताना पाणी पिणे
पोषणतज्ञांच्या मते, जेवताना पाणी पिणे टाळावे. कारण जेवताना अधूनमधून पाणी पिल्याने पचनक्रिया बिघडते आणि पोटफुगी वाढते. म्हणून जेवणाच्या अर्धा तास आधी किंवा जेवणानंतर १-२ तासांनी पाणी प्यावे. शिवाय जर तुम्हाला जेवताना पाणी प्यायचे असेल तर अगदी एक- दोन घोट प्यावे.
हेही वाचा: Breakfast Plan For Wight Loss: वजन कमी करायचंय? फॉलो करा हा आठवड्याचा ब्रेकफास्ट प्लॅन
प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिणे
बहुतेक लोक पाणी पिण्यासाठी प्लास्टिकच्या बाटल्या वापरतात. या बाटल्यांमुळे पाण्यात मायक्रोप्लास्टिक मिसळू शकतात, ज्यामुळे शरीराला हानी पोहोचू शकते. म्हणून पाणी पिण्यासाठी नेहमी स्टील किंवा तांब्याच्या बाटल्या वापरण्याचा सल्ला पोषणतज्ञ देतात.
( Disclaimer: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. ‘Tezzbuzz.com’ आणि ‘Only मानिनी’ या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )
Comments are closed.