Green Tea: आता ग्रीन टीची कडू चव विसरा; ‘हे’ घटक एकदा मिसळून पाहा !

फिटनेस फ्रिक असणारे अनेक जण ग्रीन टी दररोज घेतात. पण काहींना त्याची चव आवडत नाही. ग्रीन टी चवीला थोडा कडवट असतो. यामुळे तुम्हाला जर ग्रीन टीची कडवट चव आवडत नसेल तर काही घटक त्यात मिसळून तुम्ही घेऊ शकता. यामुळे ग्रीन टीचा कडवटपणा कमी होतो. ( How to make Green Tea taste better ? )

लिंबू ग्रीन टी
ग्रीन टीमध्ये लिंबू मिसळल्यास त्याची चव चांगली लागते आणि त्याचा कडूपणा कमी होतो. शिवाय लिंबूमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते, ते आपल्या त्वचेला नैसर्गिक चमक देण्यास उपयुक्त ठरते. लेमन ग्रीन टी पिल्याने शरीर डिटॉक्सिफाय होते आणि पचनक्रिया सुधारते.

मध ग्रीन टी
मध चवीला गोड असते आणि त्यात नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल गुणधर्म देखील असतात. ग्रीन टीमध्ये थोडे मध घातल्यास गोड चव येते दररोज पिणे सोपे होते. तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळी त्याचा आनंद घेऊ शकता.

मिंट ग्रीन टी
ग्रीन टीमध्ये ताजी पुदिन्याची पाने घालून पिल्याने ताजेपणा जाणवतो. यामुळे पोट शांत राहते आणि पचनक्रिया सुधारते. ग्रीन टीमध्ये पुदिन्याचा फ्लेवर चवीला छान लागतो. दुपारच्या जेवणानंतर मिंट ग्रीन टी पिल्याने पोट हलके राहते.

आले ग्रीन टी
जिंजर ग्रीन टी हिवाळ्यात पिण्यासाठी खूप आरोग्यदायी पेय आहे. त्यात दाहक-विरोधी गुणधर्म असतात जे संसर्गाच्या आजारांपासून शरीराचा बचाव करण्यास मदत करतात. आल्याच्या किंचित तिखट चवीमुळे ग्रीन टीचा स्वाद चांगला लागतो. ते यामुळे शरीर उबदार ठेवण्यास मदत होते.

आइस्ड ग्रीन टी
जर तुम्हाला कोल्ड ड्रिंक आवडत असेल तर आइस्ड ग्रीन टी हा एक उत्तम पर्याय आहे. ग्रीन टी बनवून रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा आणि त्यात बर्फाचे तुकडे, लिंबू आणि पुदिना घाला. उन्हाळ्याच्या दिवसात हा ग्रीन टी उपयुक्त ठरतो. तुम्ही पार्टीमध्ये हा ग्रीन टी देखील देऊ शकता.

मसालेदार ग्रीन टी
जर तुम्हाला मसाल्यांचा स्वाद आवडत असेल तर ग्रीन टीमध्ये दालचिनी, वेलची किंवा लवंगासारखे मसाले घाला. दूध आणि साखरेशिवाय बनलेला हा टी आरोग्यदायी ठरतो. या मसाल्यांना एक विशिष्ट सुगंध असतो. संध्याकाळी हा ग्रीन टी घेतल्याने शरीर उबदार ठेवण्यास मदत होते.

तुळशीचा ग्रीन टी
ग्रीन टीमध्ये ताजी तुळशीची पाने उकळा. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तुळशीचे अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्म शरीराचा सर्दी आणि संसर्गापासून बचाव करतात. हिवाळ्याच्या काळात सकाळी आणि संध्याकाळी तुळशीचा ग्रीन टी घ्या. यामुळे तुमचे शरीर निरोगी राहील.

हेही वाचा: Health Tips: मिल्क, ब्लॅक की ग्रीन टी, कोणता चहा आरोग्यासाठी चांगला?

Comments are closed.