Razor Shaving Tips: महिलांच्या त्वचेसाठी रेझर शेव्हिंग कितपत सुरक्षित?

अनेकदा महिलांना शरीरावरचे केस काढण्यासाठी पार्लरला जाऊन वॅक्सिंग करण्यासाठी वेळ नसतो. अशावेळी चटकन घरच्या घरी रेझर शेव्हिंग केले जाते. हा उपाय सोपा, स्वस्त असला तरी रेझर शेव्हिंगमुळे त्वचेला नुकसान होते. त्यामुळे तुम्ही पण जर रेझर शेव्हिंग करत असाल तर काही गोष्टी तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे. ( Is Razor Shaving Safe For Skin )

रेझर शेव्हिंगचे फायदे

  • रेझरने केस काढणे ही एक स्वस्त आणि सोपी पद्धत आहे. त्यासाठी कोणत्याही विशेष उपकरणांची किंवा महागड्या उत्पादनांची आवश्यकता नाही. रेझर स्वस्त असतात आणि कोणत्याही समस्यांशिवाय घरी त्याचा सहज वापर करता येतो.
  • रेझरच्या धारेमुळे त्वचेवरील मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यास मदत होते. यामुळे त्वचा चमकदार आणि ताजी दिसते. याला डर्माप्लॅनिंग असेही म्हणतात. तसेच कधीकधी वॅक्सिंग केल्यावर त्वचेवर डाग पडतात. मात्र रेझरने केस काढल्याने त्वचेवर कोणतेही डाग राहत नाहीत. जर रेझरचा योग्यरित्या वापर गेला तर त्यामुळे त्वचेवर कमीत कमी रिअ‍ॅक्शन होते.

रेझर शेव्हिंगमुळे होणारे नुकसान

  • रेझर वापरताना काळजी न घेतल्यास, त्वचेवर जळजळ होऊ शकते, कट किंवा जखम होण्याचा धोका वाढतो. जर रेझर स्वच्छ नसेल किंवा जुना असेल तर बॅक्टेरियाच्या संसर्गाचा धोका वाढतो.
  • रेझरने केस काढताना चेहऱ्यावर जखमा होण्याचा धोका असतो. जर त्वचा संवेदनशील असेल किंवा रेझर चुकीच्या पद्धतीने वापरला गेला असेल तर ही समस्या गंभीर होते. रेझरने केस काढल्यानंतर केसांची वाढ लवकर होते. यामुळे वारंवार शेव्हिंग करण्याची वेळ येते.
  • जर त्वचा आधीच संवेदनशील असेल, तर रेझरमुळे संसर्ग आणि ऍलर्जी होऊ शकते.

हेही वाचा: Liquid Blush VS Powder Blush: लिक्विड की पावडर ब्लश? तुमच्या त्वचेसाठी काय सर्वोत्तम?

Comments are closed.