Nail Extension : नेल एक्सटेंशन पडू शकतं महागात, वाचा नखांवर काय होतात परिणाम
हल्ली नेल एक्सटेंशन एक ट्रेंड बनला आहे. बऱ्याच ब्राईड लग्नात नखे सुंदर दिसावीत यासाठी नखांवर विविध प्रकारचे एक्सटेंशन लावतात. नखे सुंदर, मजबूत आणि लांब दिसण्यासाठी हा एक उत्तम ऑप्शन आहे. अगदी 10 ते 15 मिनिटांत एक्सटेंशन करून तयार होते. पण, तुम्हाला माहीत आहे का की, हे नेल एक्सटेंशन महागात पडू शकते. नेल एक्सटेंशनमुळे नखांवर परिणाम होऊन ते खराब होण्याचा धोका असतो. आज आपण जाणून घेऊयात नेल एक्सटेंशनचे परिणाम आणि करताना काय काळजी घ्यावी.
- नेल एक्स्टेंशनमुळे खरी नखे कमकुवत होतात. कारण एक्स्टेंशन करण्यापूर्वी नखे वरून फिलिंग केली जातात आणि जर हे फिलिंग खूप जास्त असेल तर नखे कमकुवत होतात आणि सहजपणे तुटतात.
- एक्स्टेंशन करताना वापरल्या जाणाऱ्या रसायनांमुळे त्वचेला संसर्ग होऊ शकतो, खाज येऊ शकते किंवा फोड सुद्धा येऊ शकतात.
- नखांच्या आजूबाजूची त्वचा म्हणजे क्युटिकल्स कोरडी पडण्याचा धोका असतो.
- वारंवार एक्सटेंशन केल्यास मूळ नखांचे आरोग्य बिघडू शकते.
- एक्सटेंशन घाईघाईने किंवा चुकीच्या पद्धतीने काढल्यास त्वचेला इजा होऊ शकते.
हेही वाचा – Liquid Blush VS Powder Blush: लिक्विड की पावडर ब्लश? तुमच्या त्वचेसाठी काय सर्वोत्तम?
काळजी कशी घ्यावी?
- एक्सटेंशन काढल्यानंतर नखांना मॉइश्चरायझर लावावे.
- नखांची स्वच्छता ठेवावी आणि ती कोरडी होऊ देऊ नयेत.
- एक्सटेंशन काढण्यासाठी धारदार वस्तूंचा वापर टाळावा.
- नखांच्या आरोग्यासाठी योग्य विश्रांती द्यावी आणि पौष्टिक आहार घ्यावा.
महत्त्वाचे –
नेल एक्स्टेंशन व्यावसायिक नेल टेक्निशियनकडे करावे. बर्याच स्त्रिया, जेव्हा नेल एक्स्टेंशन काढण्याची वेळ येते, तेव्हा काही जुगाड करून ते घरीच करण्याचा प्रयत्न करतात, परंतु यामुळे खऱ्या नखांनाही नुकसान होऊ शकते, त्यामुळे ते काढतानाही तुम्ही एखाद्याचा सल्ला घ्यावा.
हेही वाचा – Razor Shaving Tips: महिलांच्या त्वचेसाठी रेझर शेव्हिंग कितपत सुरक्षित?
Comments are closed.