Maternity Bag : डिलिव्हरीसाठी हॉस्पिटलमध्ये जाताना मॅटरनिटी बॅगेत या वस्तू हव्याच !

आई होण्याचा अनुभव आयुष्यातला कधीही न विसरता येणारा अनुभव आहे. बाळाची चाहूल लागल्यापासून ते बाळाचा जन्म होईपर्यंतचे सर्व क्षण आईसाठी अनमोल असतात. या दिवसात आई आणि बाळ दोघांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागते. आईचं खाणंपिणं ते अगदी डिलीव्हरीसाठी हॉस्पिटलमध्ये जाईपर्यंत खास तयारी करावी लागते. ही तयारी डिलिव्हरी डेट जवळ येण्याआधीच करणे आवश्यक असतं, नाहीतर ऐनवेळी धावपळ होऊ शकते. आज आपण जाणून घेऊयात डिलिव्हरीसाठी जाताना कोणत्या गोष्टी बॅगेत असायला हव्यात.

मूलभूत वस्तू –

रुग्णालयात नेण्यासाठी बॅगपॅक करताना एका पाऊचमध्ये टुथपेस्ट, फेसवॉश, बॉडीवॉश, शॅम्पू, कंडिशनर, टिश्यू, टॉवेल, हेअर ब्रश, साबण, रुमाल या वस्तू भराव्यात. डिलिव्हरीनंतर रुग्णालयात राहिल्यावर या वस्तू उपयोगी पडतात.

बाळाच्या वस्तू –

डायपर, वाईप बॅगेत घ्या. नवजात बाळाची त्वचा नाजूक असते त्यामुळे उत्तम क्वॉलिटीचे विकत घ्या.

प्रसूती पिशवी
प्रसूती पिशवी

बाळाचे कपडे –

बाळासाठी लंगोट, झबलं, टोपडं आणि दुपटी स्वच्छ धुवून निर्जंतूक करून सुकवा आणि बॅगेत भरून ठेवा. बाळाला घरी घेऊन येताना त्याला गुंडाळण्यासाठी बेबी ब्लॅंकेट बॅगेत ठेवणं फायद्याचं ठरेल.

स्वत:साठी –

डिलिव्हरीनंतर काही दिवस अंगावरून रक्त जातं. यासाठी सॅनिटरी पॅड बॅगेत ठेवा. ब्रेस्ट फिडिंग गाऊन सोबत ठेवा, जेणेकरून बाळाला दूध पाजताना अवघड जाणार नाही.

वैद्यकीय अहवाल –

तुमच्या गर्भधारणेच्या प्रत्येक तिमाहीतील नोंदींसह तुमचे सर्व वैद्यकीय अहवाल आणि प्रिस्क्रिप्शन आणा. रुग्णालयात जाण्यापूर्वी या वस्तू तुमच्यासोबत ठेवा. यामुळे तुम्हाला प्रसूतीदरम्यानची माहिती मिळण्यास मदत होईल. तुम्ही तुमची फाइल त्यावेळी तुमच्यासोबत उपस्थित असलेल्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला देऊ शकता.

पैसे –

डिलिव्हरीच्या दिवशी पैसे जमा करावे लागतील. त्यामुळे घराबाहेर पडताना रोख रक्कम आणि क्रेडिट कार्ड सोबत ठेवा.

हेही वाचा – Kids Health Tips: 3 ते 12 वयोगटातील मुलांना चुकूनही देऊ नयेत ‘हे’ पदार्थ

Comments are closed.