UTI Infection: यूटीआयचा त्रास टाळण्यासाठी ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक महिलांना यूटीआयची ( Urinary Tract Infection ) समस्या भेडसावत आहे. सुमारे ५० टक्के स्त्रिया या त्रासाला सामोरे जात आहेत. आकडेवारी दर्शवते की प्रत्येक १० पैकी सहा महिलांना हा संसर्ग होतो. कोलाय सारखे हानिकारक जीवाणू मूत्रमार्गातून शरीरात प्रवेश करतात आणि मूत्राशय किंवा मूत्रपिंडात पोहोचतात तेव्हा हा संसर्ग होतो. जेव्हा हे जीवाणू वाढू लागतात तेव्हा लघवी करताना जळजळ होणे, वारंवार लघवी होणे, ओटीपोटात वेदना आणि ताप येणे अशी लक्षणे दिसतात. ( How to prevent UTI Infection ? )

युरीन इन्फेक्शन म्हणजे काय?
युरीन इन्फेक्शन म्हणजे युरिनमध्ये बॅक्टेरीयांचे संक्रमण होणे. याला युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन अर्थात ‘युटीआय’ असे म्हटले जाते. युरिनरी ब्लॅडर आणि त्याच्या नळ्या ज्यावेळी बॅक्टेरियानी संक्रमित होतात. तेव्हा त्याला युटीआय म्हटले जाते. तसेच हे बॅक्टेरिया मूत्रमार्गातून शरीरात प्रवेश करतात आणि मूत्राशय, किडनीला इजा देखील करतात. यावर जर त्वरित उपचार केले नाहीत तर मूत्रपिंडाचे गंभीर नुकसान होऊ शकते. दरम्यान, सामान्यतः काही गोष्टींची काळजी घेतली तर तुम्हाला या संसर्गापासून धोका नसतो.

हायड्रेशन आणि स्वच्छता
युटीआयमुळे लघवीला त्रास होऊ शकतो. यासाठी भरपूर प्रमाणात पाणी पिणे गरजेचे आहे. याने तुम्ही वारंवार लघवी कराल आणि लघवीतून बॅक्टेरिया लवकर बाहेर पडतील. तुमचा त्रास आणि अस्वस्थता देखील कमी होईल. तुमची UTI समस्या गंभीर नसल्यास, तुम्ही एक-दोन दिवसांत बरे होऊ शकता. तसेच योनीच्या स्वच्छतेकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.

रासायनिक उत्पादने आणि घट्ट कपडे टाळा
परफ्यूमयुक्त साबण, स्प्रे किंवा जास्त रसायने असलेली उत्पादने वापरल्याने जननेंद्रियांचे नैसर्गिक पीएच संतुलन बिघडते. यामुळे चांगले बॅक्टेरिया मरतात आणि संसर्गाचा धोका वाढतो. तसेच खूप घट्ट जीन्स किंवा सिंथेटिक इनरवेअर घातल्याने ओलावा कायम राहतो, ज्यामुळे बॅक्टेरिया वाढण्यासाठी अनुकूल वातावरण तयार होते. त्यामुळे नेहमी सैल आणि सुती कपडे घालावे.

प्रोबायोटिक्सयुक्त आहार
आपल्या आहारात दहीसारख्या प्रोबायोटिक्सयुक्त पदार्थांचा अवश्य समावेश करा. प्रोबायोटिक्स पदार्थ आतड्यात फायदेशीर बॅक्टरीयाच्या वाढीस प्रोत्साहन देतात. जे युरिनरी ट्रॅक्टमध्ये निरोगी संतुलन राखण्यास मदत करू शकतात.

हेही महत्त्वाचे:

  • जर तुम्हाला युटीआयचा त्रास जाणवत असेल आणि घरगुती उपचार करूनही जर २-३ दिवसांत संसर्ग बरा झाला नाही तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.
  • लघवीतून रक्त येणे, कंबरदुखी किंवा ताप येत असेल तर तुम्हाला वैद्यकीय सल्ल्याची गरज असू शकते.

Comments are closed.