मिनिमलिस्ट ज्वेलरीत मिळवा स्टायलिस्ट लूक
रोजच्या धावपळीत स्वत:ला छान ठेवणं एक टास्क झालयं. त्यात मेकअप, हेअर स्टाईल, कपडे हे जरी महत्वाचे असलं तरी त्यावर तुम्ही स्टाईल केलेली ज्वेलरीही तेवढीच महत्वाची असते. कारण कधी कधी तुमचे ड्रेसेस, साडी साधी असेल तरी चालते. पण तुम्ही त्यावर घातलेलेी ज्वेलरीच तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे दाखवते. यामुळे महिलांच्या लूकमध्ये ज्वेलरीही महत्वाची असते.
पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही नेहमीच अंगावर ढिगभर ज्वेलरी घालावी. कारण बऱ्याच महिलांना ज्वेलरीचे क्रेझ असते. त्यात जर तुम्ही अंगभरून ज्वेलरी घातलेली असेल तर ती प्रत्येक ठिकाणी योग्यच दिसेल असे नसते. त्यापेक्षा कमीत कमी ज्वेलरी घालूनही तुम्ही इंप्रेसिव्ह, स्मार्ट दिसू शकता.
सध्या मिनिमलिस्ट ज्वेलरीचा जमाना आहे. यामुळे आपण बऱ्याच इवेंटमध्ये बघतो. काहीजणी साधी साडी नेसतात त्यावर कोणतीच ज्वेलरी घालत नाहीत. तरीही त्या देखण्या आणि आकर्षक दिसतात. त्याउलट जी महिला भरजरी साडी,भरपूर ज्वेलरी घालून आलेली असते तिच्याकडे फक्त देखावा म्हणून बघितले जाते. यामुळे भरपूर ज्वेलरी घालण्याएवजी कमीत कमी ज्वेलरीही तुम्हाला इंप्रेसिव्ह लूर देते. हे समजून घ्या.
आजच्या काळात काही प्रसंग वगळता महिला खूप नक्षीकाम केलेली, कुंदन लावलेली जड ज्वेलरी घालणे टाळतात. कारण जड ज्वेलरी कॅरी करणे कठीण असते. त्यामुळे बऱ्याचवेळा महिला प्रत्येक ड्रेसवर स्टाईल करण्यासाठी वेगवेगळी ज्वेलरी सोबत कॅरी करतात. त्यातही लाईट वेट ज्वेलरी महिलांना आकर्षित करते.
सध्या सोन्या चांदीचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे आर्टीफिशियल ज्वेलरीकडे महिलांचा कल सर्वाधिक आहे. कारण स्वस्त असतात. त्यामुळे वेगवेगळ्या स्टाईलच्या ज्वेलरी सहज विकत घेता येतात. शिवाय हरवली चोरीला गेली तरी टेन्शन नसतं. छोट्याशा पॉकेटमद्ये कॅरी करता येतात.
प्रामुख्याने जॉब करणाऱ्या वर्कींग वुमनची पहीली पसंती अशाच हलक्या वजनाच्या ज्वेलरीला असते. या ज्वेलरी तुम्हाला साधा आणि एलिगंट लूक देतात. वि्शेष म्हणजे या ज्वेलरी कोणत्याही आऊटफिटवर सूट होतात.
Comments are closed.