Health Tips: मेटाबॉलिजम वाढविण्यासाठी फॉलो करा हे डायट, वजन कमी करण्यास होईल मदत
अनेकदा वजन कमी करणे कठीण जाते. मेटाबॉलिजम म्हणजेच चयापचय लो असणे हे यामागचे प्रमुख कारण असू शकते. जेव्हा चयापचय मंदावतो तेव्हा लठ्ठपणा वेगाने वाढतो, ज्यामुळे वजन कमी होत नाही. अशावेळी वजन कमी करण्यासाठी सर्वात आधी तुमचे चयापचय सुधारणे गरजेचे आहे. अनेकदा कमी अन्न घेतल्याने वजन कमी होते असा समज होतो. मात्र उपाशी राहून नव्हे तर योग्य आणि पौष्टिक आहार घेतल्यास चयापचय सुधारण्यास मदत होते. ( How to increase metabolism )
वजन कमी करण्यासाठी सर्वप्रथम सकाळी उठल्यानंतर पाच भिजवलेले बदाम आणि अक्रोड खा. तुम्ही जिऱ्याचे पाणी देखील पिऊ शकता. बदाम आणि अक्रोड शरीराला ऊर्जा देतात आणि जिऱ्याचे पाणी पचन सुधारण्यास फायदेशीर ठरते.
वजन कमी करताना नाश्ता वगळण्याची चूक करू नका. कारण यामुळे शरीराला ऊर्जा मिळत नाही. तुम्ही नाश्त्यात पोहे किंवा ओट्स खाऊ शकता. याशिवाय पनीर सँडविच किंवा दोन अंड्यांचे ऑम्लेट देखील खाऊ शकता. लक्षात ठेवा सकाळचा नाश्ता हा पोटभर, पौष्टिक आणि प्रोटीनने समृद्धच असावा. सकाळी वेळेत आणि पौष्टिक नाश्ता केल्याने दिवसाची सुरुवात हाय मेटाबॉलिजमने होते.
दिवसभरात आहारात हंगामी फळांचा समावेश करा. फळांमध्ये फायबर आणि आवश्यक पोषक घटक असतात ज्यामुळे बद्धकोष्ठता दूर होते आणि शरीराला ऊर्जा मिळते.
दुपारच्या जेवणात सॅलड घ्या. तसेच दह्याचा समावेश करा. भाजी, डाळ आणि पोळी खाऊ शकता. पौष्टिकतेसाठी तुम्ही गव्हात नाचणी, सोयाबीन घालू शकता. गव्हापेक्षा मल्टिग्रेन रोटीमुळे वजन कमी करण्यास मदत होते.
संध्याकळच्या नाश्त्याला तुम्ही भाजलेले चणे किंवा मखाना खाऊ शकता. तर रात्रीच्या जेवणासाठी हिरव्या चटणीसोबत भाज्या घातलेली खिचडी खा. रात्रीचे जेवण शक्यतो हलके असावे. तुम्ही दलियाही रात्री घेऊ शकता.
झोपण्यापूर्वी दालचिनीची चहा किंवा ग्रीन टी घ्या. यात असणारे अँटी-ऑक्सिडंट्स चरबी जाळण्यास मदत करतात. तसेच दिवसभरात पुरेसे पाणी प्या. पाण्यामुळे मेटाबॉलिजम वाढण्यास मदत होते.
( Disclaimer: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. ‘Tezzbuzz.com’ आणि ‘Only मानिनी’ या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )
Comments are closed.