Turmeric Milk: ‘या’ लोकांनी घेऊ नये हळदीचे दूध; आरोग्यासाठी ठरेल घातक
हळदीचे दूध आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी मानले जाते. दररोज हळदीचे दूध घेतल्याने रोगप्रतिकारकशक्ती वाढते. तसेच सांधेदुखी कमी होते आणि जळजळ कमी होते. फूड्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या २०१७ च्या अहवालानुसार, हळदीमध्ये असलेल्या कर्क्यूमिनमध्ये अँटीऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. हळदीच्या दुधाचे आरोग्याला इतके फायदे होत असले तरी काही लोकांच्या आरोग्यासाठी ते घातक ठरू शकते. ( Who should not drink Turmeric milk? )
हळदीमुळे शरीरात पित्त निर्मितीची प्रक्रिया वेगवान होते. जर एखाद्याला पित्ताच्या समस्या असतील तर हळदीचे दूध पिल्याने त्रास वाढतो आणि अस्वस्थ वाटते. त्यामुळे पित्ताचा त्रास असलेल्यांनी हळदीचे दूध घेताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
हळद रक्तातील साखर कमी करण्यास मदत करते. मात्र, जर तुम्ही आधीच मधुमेहाची औषधे घेत असाल, तर हळदीचे दूध साखरेची पातळी गरजेपेक्षा जास्त कमी करू शकते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी प्रमाणात हळदीचे दूध घ्यावे.
हळदीमुळे शरीरातील लोहाचे शोषण कमी होऊ शकते. शरीरात हिमोग्लोबिन कमी असलेल्या लोकांसाठी दररोज हळदीचे दूध घेणे हानिकारक असू शकते. जर तुम्हाला ॲनिमिया किंवा लोहाची कमतरता असेल, तर हळदीचे अतिसेवन टाळावे.
हेही वाचा: Health Tips: मेटाबॉलिजम वाढविण्यासाठी फॉलो करा हे डायट, वजन कमी करण्यास होईल मदत
हळद रक्त पातळ करण्याचे काम करते. जर तुमची कोणतीही शस्त्रक्रिया होणार असेल, तर किमान दोन आठवडे आधी हळदीचे दूध पिणे टाळावे, जेणेकरून शस्त्रक्रियेदरम्यान अतिरक्तस्त्रावाचा धोका राहणार नाही.
ज्यांना वारंवार ॲसिडिटी, पोट फुगणे किंवा गॅसचा त्रास होतो, अशा लोकांसाठी हळदीचे दूध त्रासदायक ठरू शकते. हळद उष्ण असल्याने काहींना जुलाब किंवा मळमळ असे त्रास होऊ शकतात.
( Disclaimer: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. ‘Tezzbuzz.com’ आणि ‘Only मानिनी’ या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )
Comments are closed.