भावनांवर नियंत्रण म्हणजे आयुष्यावर नियंत्रण
काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर आणि मोह या मानवी मनातील सहा भावना आहेत . ज्यांना षड्रिपू (सहा शत्रू) म्हणतात. जर त्या प्रमाणात राहील्या तर आयुष्य सुंदर होते. पण जर यातील क्रोध आणि मत्सर या भावनांचे विकारात रुपांतर झाले तर मात्र यात अनेकांचं आयुष्य उद्धवस्त होतं. कारण आपल्या रोजच्या आयुष्यातही आपण अनेक बऱ्या वाईट प्रसंग, घटनांना सामोरे जात असतो. यामुळे या भावनांना वेळीच आवर कसा घालावा, त्यावर नियंत्रण कसं मिळवावं ते प्रत्येकाने शिकायला हवं.
रागात केलेले कृत्य हे क्षणीक असते. त्याक्षणाला आलेल्या क्रोधातून झालेली ती कृती जरी असली तरी कधी कधी त्याचे गंभीर परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात. याच ताजं उदाहरण म्हणजे काही दिवसांपूर्वी मुंबईतील लोकलमधून उतरताना झालेल्या किरकोळ वादातून ओमकार शिंदे नामक व्यक्तीने सहप्रवासी शिक्षक आलोक कुमार सिंहवर धारदार चिमट्याने हल्ला केला ज्यात त्याचे प्राण गेले. तसं बघायला गेलं तर हा वाद किरकोळ होता. त्याकडे दुर्लक्ष करता येणं शक्य होतं. कारण प्रवासादरम्यान असे किरकोळ वाद होतच असतात. पण शिंदेने राग डोक्यात ठेवला आणि रागातून पुढील कृत्य केलं. ढासळत चाललेल्या मानसिक संतुलनाचं हे उदाहरण आहे.
एका क्षणात राग आणि मत्सर तुमच्याकडून काय करून घेईल ते सांगता येत नाही. पण इतक्या टोकाच्या रागाची भावना ही अशी एका घटनेनं मनात य़ेत नाही. तर तो राग हळूहळू मनात वाढत असतो. अनियंत्रित होत असतो. आणि त्याला चँलेज करणाऱ्या घटनेतून तो अशा प्रकारे बाहेर येतो. त्याची कारणं , मूळही व्यक्तीनिहाय वेगवेगळी असू शकतात. पण ही परिस्थिती टाळता येते. कारण ती भावना आहे जी तुम्ही नियंत्रणात आणू शकता. त्यासाठी काय करावे ते बघूया.
राग येत असेल तर शांत राहावे
मनातल्या मनात दहा आकडे बोलावे
मेडीटेशन करावे
प्राणायाम करावे
दिर्घ श्वास घ्यावा
नियमित ध्यानधारणा करावी
प्रसंगी मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा
Comments are closed.