Shivneri Fort : किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या 396 व्या जयंतीचा उत्साह; पाहा फोटो
पुणे : राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396 व्या जयंतीचा उत्साह आज (19 फेब्रुवारी) राज्यासह देशभरात पाहायला मिळत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवरायांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर विशेष शासकीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिवनेरीवर जाऊन महाराजांना अभिवादन करता यावे, महाराजांना मानाचा मुजरा करता यावा, यासाठी हजारोंच्या संख्येने शिवप्रेमींनी बुधवारी (18 फेब्रुवारी) रात्रीपासून गर्दी केली होती. त्यानंतर आज (19 फेब्रुवारी) सकाळी शिवनेरीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार आणि अभिनेता रितेश देशमुख यांच्या उपस्थितीत शासकीय कार्यक्रम पार पडला.







Comments are closed.