Coconut Water Vs Sugarcane Juice : नारळ पाणी की उसाचा रस, आरोग्यासाठी काय फायदेशीर?

होळीचा सण झाल्यावर वातावरणात बदल होऊन उष्णता वाढू लागते. उष्णता वाढल्यामुळे पाण्यासह विविध पेय प्यायली जातात. पाणी उन्हाळ्याच्या उष्णतेपासून वाचण्यासाठी, डिहाड्रेशनशी लढण्यासाठी फायदेशीर असते. विशेष करून उन्हाळ्यात उसाचा रस किंना नारळ पाणी अधिक प्रमाणात प्यायले जाते. पण, शरीर निरोगी राहण्यासाठी या दोन्ही पेयांपैकी सर्वात उत्तम पर्याय कोणता? जाणून घेऊयात या प्रश्नाचे उत्तर.

नारळ पाणी –

नारळ पाणी

नारळाचे पाणी हे सर्वात लोकप्रिय पेय आहे. सर्वात शुद्ध पेय म्हणून नारळ पाण्याची ओळख आहे. यात पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि सोडियम असे असंख्य पोषक घटक असतात. हे पोषक घटक शरीर निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक आहेत. याशिवाय नारळाच्या पाण्यात कॅलरीज कमी असतात आणि त्यात चरबीही नसते. त्यामुळे वेट लॉससाठी नारळ पाणी उत्तम पर्याय आहे.

उसाचा रस –

उन्हाळ्यात उसाचा रस पिणे फायदेशीर आहे. यात नैसर्गिक साखर असते. आयुर्वेदानुसार कावीळ सारख्या आजारांवर उसाचा रस फायदेशीर आहे. यात कॅल्शियम, लोह आदी पोषकतत्वे असतात. ही पोषकतत्वे हाडे आणि रक्तासाठी उत्तम सांगितली जातात.

आरोग्यासाठी कोणते पेय उत्तम ?

हायड्रेट राहण्यासाठी नारळ पाण्याचा पर्याय योग्य आहे. जेव्हा तुम्ही खूप थकलेले असाल त्वरीत उर्जेची आवश्यकता असेल तर उसाचा रस पिणे फायद्याचे ठरेल. पण, तुम्हाला डायबिटीस असेल उसाचा रस पिणे टाळावे याउलट नारळ पाणी प्यावे. आरोग्यासाठी गरजेनुसार दोन्ही पेये आवश्यक आहेत तुम्ही गरज लक्षात घेऊन ते पिऊ शकता.

हेही वाचा –

फ्रिजमध्ये भाज्या साठवण्यासाठी प्लास्टिक पिशवीचा वापर करताय?

Comments are closed.