Healthy Lunch : दुपारच्या जेवणात असावेत हे पदार्थ, आरोग्य राहील उत्तम
धावपळीच्या लाईफस्टाईलमध्ये आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते. कामाची दगदग, प्रवास, ताण या सर्वांवर मात करण्यासाठी सकस आहार महत्त्वाचा आहे. विशेष करून दुपारचे जेवण आरोग्याच्यादृष्टीने पोषक असायला हवे. कारण या दुपारच्या जेवणावरच आपली उर्वरित दिवसाची ऊर्जा आणि कार्यक्षमता अवलंबून असते. पण, बऱ्याच लोकांना दुपारच्या जेवणात नेमके कोणते पदार्थ खावेत, हे ठाऊक नसते. आज आपण आरोग्यतज्ज्ञांच्या मते, दुपारच्या जेवणाचे नियम काय आहेत हे समजून घेऊयात.
- तुमचे दुपारचे जेवण फक्त पोट भरण्यासाठी नसावे. यात कार्बोहायड्रेट्स, प्रोटिन, फायबर आणि व्हिटामिन्सचा समावेश असावा.
- दुपारच्या जेवणात प्रोटिनची मात्रा योग्य असायला हवी. मसूर डाळ, तूर डाळ, मूग डाळ यांचा समावेश आहारात असावा.
- पनीर, लोणी, दही यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांमधून प्रोटीन मिळते. त्यामुळे दुपारच्या जेवणासाठी हे पदार्थही उत्तम पर्याय आहेत.
- सलाडमध्ये टोमॅटो, गाजर, बीट, दुधी भोपळा आदी भाज्या खाता येतील. या पदार्थांमुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतील.
हेही वाचा – Meal Timings: तुमची जेवणाची वेळ योग्य आहे का? जाणून घ्या आयुर्वेद काय सांगते?
- भाज्यांमध्ये तुम्ही पालेभाज्या खाऊ शकता. यातून शरीराला आयर्न, फायबर आणि व्हिटामिन मिळतील.
- दुपारी पांढऱ्या तांदळाऐवजी ब्राऊन राईस, ज्वारी, बाजरी खाऊ शकता. ही फायबरयुक्त धान्ये आहेत.
- पुरेसे पाणी घेणे हे सुद्धा दुपारच्या जेवणात महत्त्वाचे आहे. शरीरातील हायड्रेशन टिकवून ठेवण्यासाठी ताक, सूप हे पदार्थ पिता येतील. फक्त शुगरयुक्त ज्यूस पिणे टाळावे.
हेही वाचा – Health Tips-रात्री फळ खाल्ल्याने वजन वाढतं की कमी होत?
Comments are closed.