झोपताना ऑफिसचा आणि भूतकाळातील घटनांचा विचार?

गाढ आणि शांत झोप फक्त आपल्या शारिरीकच नाही तर मानसिक आरोग्यासाठी गरजेची आहे. यामुळे सुदृढ राहण्यासाठी योग्य आहाराबरोबरच पुरेशी झोप घेण्याचा सल्ला डॉक्टर आवर्जून’ देतात. मात्र आपल्याकडूनच कळत नकळतपणे होणाऱ्या काही चुकांमुळे झोपेचं गणित बिघडतं. परिणामी सकाळी उठल्यावर थकवा आणि चिडचिड होते. याचा परिणाम दिवसभर जाणवतो. हे टाळण्यासाठी काय करावं ते बघूया.

अतिविचार

जर रात्री झोपताना तुमच्या डोक्यात दिवसभर घडलेल्या घटना किंवा ऑफिसचे काम याचे विचार येत असतील तर ही सवय तात्काळ मोडा. कारण अतिविचारामुळे तुमचा मेंदूला आराम मिळत नाही. झोप उडते. मनावर ताण येतो. त्यामुळे शरीर थकलेले असले तर मन विचार करत राहते.

डिजिटल

आता सगळ्यांनाच मोबाईलचे व्यसन लागले आहे. यामुळे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सगळ्यांच्याच हातात मोबाईल दिसतो. त्यातच काहीजण रात्री उशीरापर्यंत लॅपटॉपवर काम करत असतात. या डिजिटल स्क्रीनमधून निळसर रंगाचे किरण निघतात जे सामान्य डोळ्यांना दिसत नाहीत. मात्र हे निळे किरण मेंदूतील मेलाटोनिन रोखतात. यामुळे याचा प्रभाव फक्त डोळ्यांवरच होत नाही तर झोपेवरही होतो. यामुळे झोपण्याच्या एक तासा आधीच सगळीच डिजिटल डिवाईस बंद करावीत.

जेवण

रात्रीचे जेवण आणि झोपेची वेळ यात २ ते ३ तासांचे असायला हवे. तसेच रात्रीच्या जेवणात तळळेले, मसालेदार, पचण्यास जड पदार्थांचे सेवन करू नये. त्याचा परिणाम पचनक्रियेवर होतो. त्यामुळे अॅसिडीटी,छातीत जळजळ यासारख्या सम्या उद्भवतात. झोप लागत नाही. त्यामुळे रात्रीचे जेवण ७ च्या आत घ्यावे. तसेच मसालेदार खाणे टाळावे.

झोपेची वेळ

तुम्ही किती वाजात झोपता ही वेळ देखील तुमच्या झोपेचा पॅटर्न ठरवते. कारण तशी शरीरालादेखील सवय लागते. त्यावरच आपल्या शरीराचे काम सुरू असते. जर तुमच्या रात्री झोपण्याच्या आणि सकाळी उठण्याच्या वेळा ठरलेल्या असतील तर शरीराला त्याची सवय होते. जे शऱीरासाठी चांगले मानले जाते. पण जर तुम्ही कधी रात्री १० वाजता झोपता तर कधी रात्री १ वाजता तर तुमचे झोपेचे टाईमटेबलच विस्कळीत होत नाही तर त्याचे परिणाम चयपचयक्रियेवरही होतात.

हेही वाचा – Mobile Addiction: सकाळी उठताच मोबाईल पाहता? मेंदूवर होतोय गंभीर परिणाम

Comments are closed.