Jishnu Dev Verma : महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या शपथविधी सोहळ्यातील काही खास क्षण

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी मंगळवारी राज्यपाल पदाची शपथ घेतली. लोकभवनातील दरबार सभागृहात झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी वर्मा यांना राज्यपालपदाची शपथ दिली. शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. जिष्णू देव वर्मा हे महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल आहेत.







Comments are closed.