Gudhi Padwa 2026 Wishes: प्रियजनांना पाठवा गुढीपाडवा आणि हिंदू नवीन वर्षाच्या मराठमोळ्या शुभेच्छा !
हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि विशेष महत्व प्राप्त असलेला सण म्हणजे गुढीपाडवा. हा पारंपरिक सण दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेला साजरा केला जातो. या दिवसापासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक हा दिवस असतो. त्यामुळे हिंदू धर्मात गुढीपाडव्याला विशेष धार्मिक महत्त्व आहे. यंदा 19 मार्च रोजी गुढीपाडवा साजरा केला जाईल. यानिमित्त तुम्ही तुमचे नातेवाईक, प्रियजन, कुटुंबीय, मित्र- मंडळींना खास मराठमोळ्या शुभेच्छा पाठवू शकता ! ( Gudhi Padwa 2026 Wishes And Quotes In Marathi )
उभारून आनंदाची गुढी,
सुख-समृद्धी येवो तुमच्या घरी.
मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
नव्या वर्षाची नवी पहाट,
सुखाचा येईल नवा घाट,
आनंदाची गुढी उभारूया,
प्रगतीचा मार्ग धरूया.
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !
नक्षीदार काठी, त्यावर रेशमी वस्त्र,
साखरेची गाठी आणि कडुनिंबाचे शास्त्र.
गुढीपाडवा म्हणजे विजयाचे अस्त्र.
शुभ गुढीपाडवा !
जुने ते मागे सारा,
नव्या स्वप्नांना द्या उभारी,
गुढीपाडव्याच्या या शुभ दिनी,
सुख येवो तुमच्या घर दारी
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !

गुढी उभारून आकाशी,
बांधून तोरण दाराशी,
काढून रांगोळी अंगणी,
हर्ष पेरूनी मनोमनी,
करू सुरुवात नववर्षाची…
हिंदू नवीन वर्ष आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा !
सण हर्षाचा, नव्या संकल्पांचा,
इच्छा आकांक्षा, स्वप्नपूर्तीचा.
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !

राग-रुसवे विसरुन,
वाढवा नात्यातला गोडवा,
एकत्र येऊन साजरा करुया,
सण गुढीपाडवा.
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !
नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र,
त्याच्यावर चांदीचा लोटा,
उभारुनी मराठी मनाची गुढी,
साजरा करूया हा गुढीपाडवा
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
वसंताची पहाट घेऊन आली,
नवचैतन्याचा गोडवा,
समृद्धीची गुढी उभारु,
आला चैत्र पाडवा.
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !
काठीला गंध, फुलं, अक्षता
नैवेद्याला साखर, पेढा, दुधाचा लोटा
लावावे निरांजन, दाखवावी उदबत्ती
अभिमानाची गुढी दारी,
हीच खरी संपत्ती.
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !

हेही वाचा: Gudhi Padwa 2026: यंदा गुढीपाडवा कधी? जाणून घ्या तारीख आणि शुभ मुहूर्त
Comments are closed.