Summer Destinations : उन्हाळ्यात थंडावा हवा? महाराष्ट्रातील ‘ही’ ठिकाणं ठरतील बेस्ट

उन्हाळ्याची चाहूल लागली की वाढत्या तापमानामुळे सगळ्यांनाच थंडगार वातावरणाची ओढ लागते. सुट्टी मिळाली की शहराच्या गोंधळापासून दूर जाऊन निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्याची इच्छा होते. महाराष्ट्रात अशी अनेक सुंदर ठिकाणं आहेत, जिथे गेल्यावर उकाडा विसरायला होतो आणि मनाला ताजेतवाने वाटते.

जर तुम्हीही या उन्हाळ्यात कुठे फिरायला जायचा विचार करत असाल, तर महाराष्ट्रातील ही थंड हवेची ठिकाणं नक्की एक्सप्लोर करा.

महाबळेश्वर

1. महाबळेश्वर (सातारा)
साताऱ्यातील महाबळेश्वर हे राज्यातील सर्वात लोकप्रिय हिल स्टेशन मानले जाते. येथील थंड वातावरण, धुक्याने भरलेली सकाळ आणि सुंदर निसर्ग पर्यटकांना आकर्षित करतो. विस्तीर्ण पठारं, खोल दऱ्या आणि सुंदर सनसेट पॉईंट्स ही येथील खासियत आहे.

लोणावळा खंडाळा
लोणावळा-खंडाळा

2. लोणावळा-खंडाळा (पुणे)
सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वसलेली ही जुळी ठिकाणं नेहमीच पर्यटकांची पहिली पसंती ठरतात. राजमाची पॉईंट, टायगर पॉईंट, भुशी डॅम आणि कार्ला-भाजे लेणी यांसारखी ठिकाणं पाहण्यासारखी आहेत. निसर्ग आणि पावसाळी वातावरणामुळे येथे खास अनुभव मिळतो.

चिखलदरा
चिखलदरा

3. चिखलदरा (अमरावती)
विदर्भातील एकमेव थंड हवेचे ठिकाण म्हणून चिखलदऱ्याची ओळख आहे. सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेले हे ठिकाण उन्हाळ्यातही गारवा देते. गाविलगड किल्ला, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, भीमकुंड आणि पंचबोल पॉईंट ही येथील प्रमुख आकर्षणं आहेत.

माथेरान
माथेरान

4. माथेरान (रायगड)
माथेरान हे आशियातील वाहनमुक्त हिल स्टेशन म्हणून प्रसिद्ध आहे. येथे गाड्यांना प्रवेश नसल्यामुळे हवा शुद्ध आणि प्रसन्न असते. टॉय ट्रेनची सफर, पॅनोरमा पॉईंट आणि इको पॉईंट ही ठिकाणं पर्यटकांना विशेष आवडतात.

पाचगणी
पाचगणी

5. पाचगणी (सातारा)
महाबळेश्वरच्या जवळ असलेले पाचगणी हे शांत आणि निसर्गरम्य ठिकाण आहे. टेबल लँड हे आशियातील मोठ्या पठारांपैकी एक मानले जाते. याशिवाय पारसी पॉईंट आणि सिडनी पॉईंटही येथे प्रसिद्ध आहेत. पॅराग्लायडिंगसाठीही हे ठिकाण ओळखले जाते.

उन्हाळ्यातील सुट्टी आनंददायी बनवण्यासाठी या ठिकाणांची निवड उत्तम ठरू शकते. थंड हवामान, सुंदर निसर्ग आणि शांत वातावरणामुळे तुम्हाला नवचैतन्य मिळेल. त्यामुळे यंदाच्या सुट्टीत महाराष्ट्रातील या हिल स्टेशनला भेट देण्याचा प्लॅन जरूर करा.

(सर्व प्रतिमा क्रेडिट: Pinterest)

Comments are closed.