Office Bag Essentials : घर ते ऑफिस असा प्रवास करताना या गोष्टी सोबत हव्याच !
कुठेही फिरायला जाताना बॅगेत गरजेच्या अनेक गोष्टी सोबत घेतल्या जातात. यात कपडे, मेकअप-हेअर प्रॉडक्ट, पाणी, खाण्याचे पदार्थ, औषध गोळ्या आदींचा समावेश असतो. अनेकांचा असा समज असतो की, लांबचा प्रवास असेल तरच या गोष्टींची आवश्यकता असते. पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. तुम्ही दररोज करत असलेला घर ते ऑफीस असा प्रवास सोयीस्कर आणि सुरक्षित जावा यासाठी काही गोष्टी सोबत ठेवणं आवश्यक आहे.
पाण्याची बाटली –
सध्या तापमानात वाढ होत असून उष्णतेचा कहर सर्वत्र सुरू आहे. अशा वातावरणात हायड्रेट राहण्यासाठी पाण्याची बाटली सोबत ठेवावी.
ओले ऊतक –
घाम पुसण्यासाठी, खराब मेकअप क्लीन करण्यासाठी वेट टिश्यू उपयुक्त असतात. इतकंच नाही तर खाण्याआधी तुम्ही हात स्वच्छ करण्यासाठी याचा वापर करू शकता. त्यामुळे बॅगेत हे कॅरी नक्की करा.
सनग्लासेस, स्कार्फ –
उन्हापासून संरक्षण होण्यासाठी सनग्लासेस, छत्री किंवा स्कार्फ सोबत ठेवा. पुरुषांनी सनग्लासेस आणि टोपी बॅगेत ठेवावी.
सनस्क्रीन –
उष्णतेमुळे होणारे टॅनिंग रोखण्यासाठी स्त्रियांसह पुरुषांनी उन्हाळ्यात सनस्क्रीन वापरणे आवश्यक आहे. त्यामुळे ऑफिस बॅगेत सनस्क्रीन असावी.
पॉवर बँक –
फोनची बॅटरी ट्रॅव्हलिंगमध्ये डाउन होऊ शकते. अशावेळी पॉवर बँक उपयोगी पडते. त्यामुळे ती सोबत असावी.
सुका मेवा, बिस्किटे –
कामाच्या गडबडीत कधीकधी वेळेवर जेवण करणं शक्य होत नाही. अशावेळी बॅगेतील बिस्किटे किंवा ड्राय फ्रूट्स तुमची भूक काही प्रमाणात मिटवू शकतात. तुम्हाला हवे असल्यास आवडीचा सुखा खाऊ सोबत ठेवू शकता.
सॅनिटायझर –
घर ते ऑफिस असा प्रवास करताना गरजेला हात धुणं शक्य होत नाही. अशावेळी बॅक्टेरियांपासून बचाव होण्यासाठी बॅगेत सॅनिटायझर असणे आवश्यक आहे. जेणेकरून प्रवासादरम्यान काहीही खाण्याआधी हात स्वच्छ करता येतील.
हेही वाचा – Summer Bedsheet Fabrics: उन्हाळ्यात गर्मीपासून बचावासाठी वापरा ‘या’ फॅब्रिकचे बेडशीट
Comments are closed.