लहान घरासाठी परफेक्ट देव्हारा

हल्ली मुंबई पुण्यासारखा शहरांमध्ये जागेच्या वाढत्या किंमतीमुळे बिल्डर सामान्य नागरिकांना परवडेल असे बजेट फ्रेंडली लहान क्षेत्रफळाचे फ्लॅट बांधतात . या लहान फ्लॅटमध्ये देव्हाऱ्यासाठी वेगळी जागा करणं तसं अवघड जातं. यामुळे कमी जागेत योग्य दिशेला नक्की कसा देव्हारा ठेवावा असा प्रश्न अनेकांना पडतो. पण सध्याच्या या कॉम्पेक्ट फ्लॅटमध्ये शोभून दिसतील असे देव्हारे बाजारात सहज उपलब्ध आहेत.

१. भिंतीवर बांधलेले मंदिर
हे डिझाइन छोट्या घरांसाठी सर्वात योग्य आहे. भिंतीवर मंदिर लावल्याने जागा तर वाचतेच शिवाय घरही स्वच्छ व नीटनेटके दिसते.

2. कोपऱ्यातील (Corner) मंदिर
घरातील कोपऱ्यात देव्हारा, मंदिर ठेवल्यास जागेचा चांगला वापर होतो. हे डिझाइन साधे आणि आकर्षक दिसते.

3. कपाट (कॅबिनेट) मंदिर
काही जण कपाटाच्या एका भागात मंदिर तयार करतात. यामुळे मंदिर वापरात नसताना बंद ठेवता येते आणि घराचा लूकही छान राहतो.

4. फोल्ड करण्यायोग्य मंदिर
फोल्डिंग डोअर असलेले मंदिर छोटे फ्लॅटसाठी खूप उपयोगी आहे. वापर झाल्यावर ते बंद करता येते, त्यामुळे जागा मोकळी राहते.

५. लाकडी मंदिर
लाकडी मंदिर पारंपरिक आणि आकर्षक दिसते. छोटे आणि हलके लाकडी मंदिर फ्लॅटमध्ये सहज बसवता येते.

काही महत्त्वाच्या टिप्स:

मंदिर नेहमी स्वच्छ आणि शांत जागेत ठेवावे

शक्य असल्यास मंदिर पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवावे

जास्त मोठे किंवा जड मंदिर टाळावे

Comments are closed.