Flavored Toothpaste : फ्लेवर पाहून टूथपेस्ट खरेदी करता?

हल्ली बाजारात विविध प्रकारच्या टूथपेस्ट मिळतात. कोणी जास्त फेस येणारी वापरतं तर कोणी उत्तम दर्जाची वापरतं. अगदीच कोणी फ्लेवर्ड टूथपेस्ट वापरतं, म्हणजेच बाजारात एकापेक्षा एक आणि वेगवेगळ्या प्रकारच्या टूथपेस्ट उपलब्ध आहेत. बऱ्याचदा समोर अनेक पर्याय उपलब्ध असल्याने स्वत:साठी बेस्ट टूथपेस्ट निवडताना गोंधळ होतो. फक्त महागडी आहे, फ्लेवर चांगला आहे हे पाहून टुथपेस्टची खरेदी केली जाते. पण या सर्वांमुळे दातांवर परिणाम होऊन त्यांचे आरोग्य बिघडण्यास सुरुवात होते. त्यामुळे आज आपण तुम्ही जर फ्लेवर्ड टूथपेस्ट वापरत असाल तर त्याचे दातावर काय परिणाम होतात हे पाहणार आहोत.

दातांची निगा राखण्यासाठी डेंटिस्ट दिवसातून दोन वेळा दातांची स्वच्छता करण्याचा सल्ला देतात. त्यामुळे टुथपेस्टची निवड करताना अत्यंत काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या मते, टूथपेस्ट खरेदी करताना ती कोणत्या ब्रँडची आहे किंवा फ्लेवरची आहे यापेक्षा त्यात कोणते घटक हे महत्त्वाचे आहे.

काय लक्षात ठेवाल?

टूथपेस्ट खरेदी करताना ब्रँड आणि फ्लेवरऐवजी त्यातअसलेल्या फ्लोराईडचे प्रमाण तपासायला हवे. प्रौढांसाठी 1350-1500 ppm फ्लोराईड असलेली पेस्ट योग्य आहे.

तुम्ही फ्लोराईडयुक्त टूथपेस्ट खरेदी करावी. यामुळे दात स्वच्छ तर होतातच शिवाय चमकतात सुद्धा.

लहान मुलांसाठी टूथपेस्टची निवड करताना अशी निवडा ज्यात फ्लोराईड कमी प्रमाणात असेल. या पेस्टमध्ये फ्लोराईडचं प्रमाण 1000 PPM इतकं असावं.

दात घासण्यासाठी राखेचा वापर करू नये. यामुळे दात स्वच्छ होण्याऐवजी झिजू लागतात.

केवळ जाहिरातींना न भूलता कॅल्शियम, फॉस्फेट आणि जायलिटॉल सारखे घटक असलेले टूथपेस्ट खरेदी करावी.

दातांसाठी अशी टूथपेस्ट निवडा ज्यात सोडियम लॉरिल सल्फेट जास्त नसेल, कारण अशा टूथपेस्टमुळे तोंडात कोरडेपणा किंवा फोड येऊ शकतात.

टीप – वरिल माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे. अधिक सल्ल्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

हेही वाचा – Eating Disorder : सतत खाण्याची इच्छा होते? असू शकतो खाण्याचा हा आजार

Comments are closed.