White Vs Pink Salt : पांढरे की सैंधव मीठ, आरोग्यासाठी कोणतं उत्तम?
मीठ अन्नातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. मीठामुळे पदार्थांला चव येते. यात सोडियम क्लोराइड असते, जे शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या मते, एका व्यक्तीला सरासरी 5 ग्रॅम मीठ आवश्यक असते. पण आपल्या देशात प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात पदार्थांमार्फत जवळपास 11 ग्रॅम मीठ जाते. ज्याचा परिणाम म्हणजे शरीरात मिठाचे सेवन अति झाल्याने होणारा रक्तदाब. खरं तर मीठाच्या अतिसेवनाने केवळ रक्तदाबच नाही तर अनेक शारीरिक व्याधी सुरू होतात. त्यामुळे कित्येकजण पांढरे मीठ न खाता सैंधव मीठ खातात. पण खरंच आरोग्यासाठी पांढऱ्या मीठाऐवजी सैंधव मीठ योग्य आहे का? चला जाणून घेऊयात
हेल्दी लाईफस्टाईल जगण्याकडे ज्यांचा कल आहे असे लोक पांढऱ्या मिठाऐवजी सैंधव मीठ वापरत आहेत. सैंधव मीठ म्हणजे पिंक सॉल्ट ज्याला हिमालियन सॉल्ट असेही म्हणतात. या मीठात सोडियमच नाही तर लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियमसारखी अनेक घटक असतात, जी शरीरासाठी आवश्यक आहेत. हे खाणीतून मिळणारे शुद्ध आणि खनिजयुक्त मीठ आहे.
पांढरे की सैंधव मीठ?
- सैंधव मीठ जास्त प्रमाणात खाल्ल्याने फायदे होतात. तुम्ही हे कमी प्रमाणात खाल्लं तर शरीराला त्याचा फायदा होणार नाही.
- सैंधव मीठ पोटासाठी उत्तम असते तर पांढऱ्या मिठात सोडियमचे प्रमाण जास्त असल्यामुळे सूज येते आणि स्नायूंमध्ये पाणी साचण्याचा धोका उत्पन्न होतो.
- सैंधव मीठातील खनिज आणि ट्रेस एलिमेंट्स असतात, जे शरीराची उर्जा वाढवतात.
- सैंधव मीठ हे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स संतुलित ठेवते, ज्यामुळे उच्च रक्तदाब (BP) असणाऱ्यांसाठी हे उपयुक्त मानले जाते.
- जर तुम्हाला थायरॉईडचा त्रास किंवा गलगंड असेल तर पांढऱ्या मिठाचे सेवन करणे अधिक फायदेशीर ठरेल, कारण थायरॉईड आणि गलगंड दोन्ही आयोडीनच्या कमतरतेमुळे होतात. पण त्याचे सेवन प्रमाणातच करायला हवे.
- टीप – तुम्ही तुमच्या आरोग्यानुसार मीठाचे सेवन करायला हवे. कोणतेही मीठ खाताना प्रमाणात खाल्ल्यास त्याचा परिणाम शरीरावर होत नाही असे तज्ज्ञ सांगतात.
हेही वाचा – Eating Disorder : सतत खाण्याची इच्छा होते? असू शकतो खाण्याचा हा आजार
Comments are closed.