Ram Navami : राम नवमीला करा हे विशेष उपाय, प्रभू रामाचा मिळेल आशीर्वाद

रामनवमीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की, या दिवशी प्रभू श्री रामांचा जन्म झाला होता. मर्यादा पुरूषोत्तम राम यांना हा सण समर्पित आहे. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला रामनवमी साजरी केली जाते. पंचागानुसार यंदा 26 मार्च रोजी साजरी होणार आहे. असं म्हणतात की, रामनवमीला मनापासून रामाची पूजा केल्यास आणि खास उपाय केल्यास त्यांचे आशीर्वाद मिळतात.

रामरक्षा स्त्रोत्र पठण –
रामनवमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून राम मंदिरात जावे. मंदिरात जाऊन रामरक्षा स्त्रोताचे पठण करावे. यामुळे येणारी संकटे दूर होतील.

हळद, कुंकू आणि चंदन –
लग्नाला उशीरा होत असेल किंवा लग्न जुळण्यास विलंब होत असल्यास रामनवमीला प्रभू श्री राम आणि सीतेला हळद, कुंकू आणि चंदन अर्पण करावेत.

हनुमान चालिसाचे पठण –
जर तुम्ही खूप दिवसांपासून एखाद्या आजाराशी झूंज देत असाल तर यापासून सुटका होण्यासाठी हनुमान चालिसाचे पठण करावे. हे पठण तुम्ही जर हनुमान मंदिरात केलेत तर उत्तम राहील. यामुळे प्रभूंसह हनुमानाचे आशीर्वाद मिळतील.

नारळ अर्पण करा –
जर मुलबाळ होण्यास अडचणी येत असतील तर रामनवमीला लाल कपड्यात नारळ गुंडाळून सीतेला अर्पण करावे. नारळ अर्पण करताना ओम नम: शिवाय मंत्राचा 108 वेळा जप करावा.

दिवे पेटवावेत –
रामनवमीला सुख-समृद्धीसाठी 11 दिवे दारात लावावेत.

धान्यांचा उपाय –
रामनवमीला श्री रामांना सात धान्ये अर्पण करावीत. यामुळे घरातील संपत्ती वाढण्यास मदत मिळते.

( Disclaimer: येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. ‘Tezzbuzz.com’ आणि ‘Only मानिनी’ त्याची हमी देत नाही. )

हेही वाचा – Ram Navami 2026: राम नवमीला अशी करा प्रभू श्री रामांची उपासना

Comments are closed.