संत्र्याच्या सालीने घालवा टॅनिंग
उन्हाळ्याच्या दिवसात तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचा काळवंडते. त्यामुळे फक्त चेहराच नाही तर हात पायाची तव्चाही निस्तेज दिसू लागते. अशावेळी त्वचा उजळवण्यासाठी बाजारात मिळणारे महागडे ब्युटी प्रॉडक्ट् वापरले जातात. तर काहीजणी ब्युटी पार्लरमध्ये जाऊन फेशियल, टैनिंग करतात. त्यासाठी बरेच पैसेही खर्च होतात. पण तुम्हाला माहीत आहे का ? तुम्ही घरच्या घरीदेखील त्वचा उजळवण्यासाठी कमी खर्चात आयुर्वेदीक उबटन बनवू शकता.
त्यासाठी संत्र्याच्या सालीची पावडर, चिमूटभर केसर, मुलेठी पावडर, चंदन पावडर आणि अॅलोव्हेरा जेल एकत्र करून त्याची पेस्ट चेहऱ्यावर लावावी. यात गुलाब पाणी किंवा कच्चे दूधही टाकल्यास चालते. ही पेस्ट आठवड्यातून दोन वेळा काळवंडलेल्या त्वचेवर लावावी. २० मिनिटांनी स्वच्छ पाण्याने धुवावे. त्वचा उजळ झाल्याचे दिसून येईल.
उबटन लावल्याने त्वचेवरील मृत कोशिका निघून जातात. त्यामुळे त्वचा स्वच्छ दिसते. या उबटनामध्ये त्वचेसाठी पोषक गुण असतात. यातील मुलेठी त्वचेतील मेलेनिनचे संतुलन राखते. केसर त्वचा उजळ करण्याचे काम करते. तर अॅलोव्हेरा जेलमुळे त्वचेचा दाह कमी होतो. संत्र्याच्या सालीत भरपूक व्हिटामीन सी असल्याने त्वचेवर नवीन कोशिका लवकर तयार होतात.
Comments are closed.