उन्हाळी सनग्लासेस : उन्हाळ्यात चेहऱ्याच्या आकारानुसार सनग्लासेस कसे निवडायचे?
उन्हाळा सुरू झाला की स्टाईलसोबतच डोळ्यांची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं ठरतं. सनग्लासेस ही केवळ फॅशन अॅक्सेसरी नसून ती सूर्यकिरण, धूळ आणि प्रदूषणापासून डोळ्यांचे संरक्षण करतात. मात्र बाजारात इतके वेगवेगळे पर्याय उपलब्ध असल्यामुळे नेमका कोणता सनग्लास घ्यावा, हा प्रश्न अनेकांना पडतो. योग्य सनग्लास निवडण्याचा सोपा मार्ग म्हणजे आपल्या चेहऱ्याचा आकार ओळखणे आणि त्यानुसार फ्रेम निवडणे. त्यामुळे तुमचा लूक अधिक आकर्षक दिसतो.
फेसशेपनुसार सनग्लास निवडण्याच्या टिप्स
1. अंडाकृती चेहरा
या प्रकारच्या चेहऱ्यावर अनेक प्रकारच्या फ्रेम्स चांगल्या दिसतात. चौरस, आयताकृती, कॅट आय किंवा एव्हिएटर स्टाईल निवडल्यास लूक अधिक उठावदार दिसतो.
2. हृदयाच्या आकाराचा चेहरा
रुंद कपाळ आणि निमुळती हनुवटी असलेल्या चेहऱ्यासाठी चौकोनी किंवा थोड्या मोठ्या फ्रेम्स योग्य ठरतात. यामुळे चेहऱ्याचा समतोल राखला जातो.
3. डायमंड आकार चेहरा
या चेहऱ्यावर बहुतेक फ्रेम्स चांगल्या दिसतात. मात्र खूप मोठ्या फ्रेम्स टाळणे गरजेचे आहे, कारण त्यामुळे चेहऱ्याचे प्रमाण बिघडू शकते.
4. त्रिकोणी चेहरा
या प्रकारच्या चेहऱ्यावर गोल, चौकोनी किंवा कॅट आय फ्रेम्स चांगल्या दिसतात. या फ्रेम्समुळे चेहऱ्याला संतुलित लूक मिळतो.
सनग्लास खरेदी करताना लक्षात ठेवाव्या गोष्टी
लहान चेहऱ्यासाठी अतिशय मोठ्या फ्रेम्स निवडू नका, कारण त्या जड वाटू शकतात. पातळ चेहऱ्यावर खूप रुंद फ्रेम्स शोभत नाहीत. तर रुंद चेहऱ्यासाठी थोड्या मोठ्या फ्रेम्स निवडल्यास लूक अधिक आकर्षक दिसतो. म्हणूनच योग्य सनग्लास निवडल्यास तुमची स्टाईलही उठून दिसते आणि डोळ्यांचे संरक्षणही होते. त्यामुळे फॅशनसोबत योग्य निवड करणे आवश्यक आहे.
Comments are closed.