उन्हाळ्यात अवश्य खावीत ही फळं

निरोगी आरोग्यासाठी ऋतुनुसार योग्य सकस आहार घेणे महत्वाचा आहे. त्यामुळे त्या त्या ऋतुनुसार आहारात हिरव्या भाज्या, पौष्टीक सूप, सुका मेवा यांबरोबरच फळे खाणेही अवश्य आहे. यामुळे सध्या सुरू असलेल्या उन्हाळ्याच्या दिवसात कोणती फळे खावीत ते बघूया.

द्राक्ष

उन्हाळ्यात पोषक तत्वाने पुरेपुर असलेली द्राक्ष बाजारात मिळतात. द्राक्ष खाल्ल्याने थकवा दूर होतो. तसेच रोगप्रतिकारकशक्तीही वाढते. यामुळे या दिवसात द्राक्ष आवर्जुन खावीत.

खेळपट्टी

या दिवसात बाजारात पिच नावाचे बदामी रंगाचे फळ मिळते. हे फळ दिवसाच्या डाएटमध्ये नक्की समाविष्ट करावे. यातील व्हिटामीन सी, व्हिटामीन, ई, ए, सेलेनियम यांसह अँटीऑक्साईड तत्व आणि फायबर असते. ज्याची शरीराला गरज असते. त्यामुळे पचनास हलके व वजन कमी करण्यासाठी उपयुक्त असलेले पिच नक्की खावे.

आंबा
उन्हाळ्यात मिळणारा रसाळ गोड चव असलेल्या आंबा या फळात सगळ्यात जास्त व्हिटामीन्सचे प्रमाण असते. आंब्यात अँटीऑक्सीडेंट गुणही असतात. जे रोगप्रतिकारकशक्ती वाढवतात. पण जर तुम्हाला शुगर असेल तर तज्त्रांच्या सल्ल्यानुसारच आंबा खावा.

संत्री

उन्हाळ्यात संत्र्याचे सेवन केल्याने ऊन लागण्याचा त्रास होत नाही. तसेच संत्री हे रसाळ फळ असल्याने बॉडी डीहायड्रेट होत नाही. तसेच शरीरातील पेशीही डॅमेज होत नाहीत.

जांभुळ

जांभळात अनेक औषधी गुण असून उन्हाळ्यात शरीरात वाढलेली उष्णता जांभळाचा रस घेतल्यास कमी होते. तोंड आल्यावरही जांभुळ खाल्यास फायदा होतो. जांभळामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते.

टरबूज
टरबूजामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे या दिवसात टरबूज खाल्ल्यास शरीर हायड्रेट राहते. तसेच रोगप्रतिकारकशक्तीही वाढते.

कलिंगड

या दिवसात कलिंगड खाणे चांगले. कलिंगड हे रसाळ फळ असल्याने यात पाण्याचे प्रमाण अधिक असते. उन्हाळ्यात घामाद्वारे शरीरातील पाणी बाहेर टाकले जाते. अशावेळी शरीरातील पाण्याची कमतरता कलिंगड ज्यूस पिऊन कमी करता येते. यात व्हिटामीन ए, बी, सी बरोबरच आयरन, मॅग्नेशियम, फॉस्फोरस सारखे मिनरल्स असतात. ज्याचा शरीराला फायदा होतो.

अननस
उन्हाळ्यात अननस अवश्य खावे. अननसात व्हिटामीन सी मुबलक प्रमाणात असते. तसेच झिंक, फॉस्फोरस, कॅल्शियम यासारखे घटक यातून मिळतात.

Comments are closed.