Normal Vs Cesarean Delivery :नॉर्मल की सिझेरियन डिलिव्हरी ? जाणून घ्या फायदे-तोटे




सामान्य वि सिझेरियन डिलिव्हरी


आई होण्याचा अनुभव आयुष्यातला कधीही न विसरता येणारा अनुभव आहे. बाळाची चाहूल लागल्यापासून ते बाळाचा जन्म होईपर्यंतचे सर्व क्षण आईसाठी अनमोल असतात. प्रत्येक महिलेसाठी बाळाचा जन्म देण्याचा दिवस अत्यंत खास असतो. या दिवशी तिचा पुनर्जन्म होतो असे म्हटले जाते. डिलिव्हरीनंतर बाळ आणि आई दोघेही सुखरुप असले की संपूर्ण कुटूंब सुटकेचा नि:श्वास सोडतात.

हल्ली नॉर्मल डिलिव्हरीपेक्षा सिझेरियन डिलिव्हरीचे प्रमाण वाढत आहे. यात अनेक महिला स्वत:हून या प्रकारच्या डिलिव्हरीला पसंती दर्शवत आहेत. तर दुसरीकडे काही महिलांच्या मते, आई आणि मुलाच्या आरोग्यासाठी नॉर्मल डिलिव्हरी योग्य आहे. वेदना सहन करून नॉर्मल डिलिव्हरी झाल्यास स्त्रीच्या शरीरासाठी हानिकारक ठरत नाही. दरम्यान, तज्ज्ञांच्या मते नॉर्मल की सिझेरियन डिलिव्हरी चांगली? त्याचे फायदे-तोटे काय आहेत जाणून घेऊयात.

नॉर्मल डिलिव्हरीमध्ये बाळाचा जन्म कोणत्याही शस्त्रक्रियेविना होतो, ज्यामुळे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. यात आई लवकर बरी होते. एखाद्या स्त्रीची नॉर्मल डिलिव्हरी झाल्यास तिला हॉस्पिटलमध्ये राहावं लागत नाही. जास्त पैसाही खर्च होत नाही. संसर्गाचा धोका कमी असतो. नॉर्मल डिलिव्हरीची  दुसरी बाजू अशीही लक्षात घ्यायला हवी की, यात वेदना जास्त होतात. कधीकधी प्रसव होण्यास वेळ लागतो, ज्यामुळे आईला शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो. तर दुसरीकडे सिझेरियन डिलिव्हरीमध्ये शस्त्रक्रिया होत असल्याने स्त्रीला बरे होण्यासाठी वेळ लागतो. खर्चही जास्त असतो. या डिलिव्हरी प्रकारात रक्तस्त्राव जास्त होतो.

तज्ज्ञांच्या मते, महिलेसाठी कोणतीही डिलिव्हरी सुरक्षित आहे हे पूर्णपणे परिस्थितीवर आणि महिलेच्या  अवलंबून आहे. जर कोणत्याही प्रकारचे अडथळे नसतील तर नॉर्मल डिलिव्हरी योग्य आहे. पण बाळाची किंवा आईची स्थिती क्रिटिकल असेल तर सिझेरियन डिलिव्हरी महत्त्वाची असते.

टीप – नॉर्मल आणि सिझेरियन या दोन्ही डिलिव्हरी पद्धतींचे फायदे आणि मर्यादा आहेत. त्यामुळे योग्य निर्णय घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत गरजेचे आहे.

हेही वाचा – Summer Tips : उन्हाळ्यात दिवसभर फ्रेश राहायचंय? आहारात ‘हे’ पदार्थ नक्की ठेवा



Comments are closed.