PCOD वर नियंत्रण मिळवण्यासाठी पाळा आहाराची ही पथ्ये
पीसीओडी हा आजार लाईफस्टाईलमध्ये झालेला बदल, चुकीचा आहार, स्ट्रेस यामुळे हार्मोन्समध्ये असंतूलन निर्माण झाल्याने महिलांमध्ये होतो. हा आजार एकदा झाला की बरा होत नाही, फक्त नियंत्रणात ठेवता येतो. अशावेळी PCOD वर नियंत्रण मिळवण्यासाठी पीसीओडीग्रस्त महिलेने आहाराची पथ्ये पाळणे आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार पीसीओडी लाईफस्टाईलशी निगडीत असल्याने तो नियंत्रित ठेवण्यासाठी आहारावर नियंत्रण असणे आवश्यक आहे. आज आपण PCOD वर नियंत्रण मिळवण्यासाठी आहाराची कोणती पथ्ये पाळायला हवीत हे पाहूयात. (PCOD नियंत्रित करण्यासाठी आहार)
पीसीओडीत शरीरातील इन्सुलिनची पातळी वाढते. त्यामुळे ग्लायसेमिक इंडेक्स कमी असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा. यासाठी आहारात तेलकट आणि गोड पदार्थ खाणे टाळायला हवे. तसेच प्रक्रियामुक्त पदार्थ आहारात टाळावेत. यासाठी पांढऱ्या तांदळाऐवजी हातसडीचा भात खाणे योग्य असेल. पॅकेज्ड फूडही खाऊ नये.
फळांचा आहारात समावेश करावा. यात स्ट्रॉबेरी, द्राक्ष अशी फळे खावीत. तुम्ही पपई देखील खाऊ शकता.

भाज्यांमध्ये ब्रोकोली, पालक, मेथी या भाज्या आहारात असाव्यात. यात फायबरचं प्रमाण जास्त असतं. फायबर वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी आवश्यक असते.

भूक लागल्यास बदाम, अक्रोड, पिस्ता, खजूर असा सुकामेवा खाऊ शकता.

जवस, चिया सीड्स, सूर्यफुलांच्या बिया यांचे सेवन अवश्य करावे.

पीसीओडीत वारंवार मूड खराब होणे, उदास वाटणे अशा समस्या निर्माण होतात. त्यामुळे आहारात दह्याचा समावेश करायला हवा. तसेच गोड खाण्याची इच्छा झाल्यास डार्क चॉकलेट खावं.

हेही वाचा – Normal Vs Cesarean Delivery :नॉर्मल की सिझेरियन डिलिव्हरी ? जाणून घ्या फायदे-तोटे
Comments are closed.