Health Care: हवं तेव्हा गोड खाता? आयुर्वेदानुसार जाणून घ्या योग्य वेळ
फिटनेसच्या काळात “नो शुगर” किंवा “लो शुगर” डाएटचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अनेकजण गोड पदार्थ पूर्णपणे टाळण्याचा प्रयत्न करतात. मात्र, पारंपरिक दृष्टिकोनानुसार गोड पूर्णपणे सोडणं योग्य मानलं जात नाही. योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी घेतलेला गोड पदार्थ शरीरासाठी ऊर्जा देणारा आणि मन प्रसन्न ठेवणारा ठरतो. पण चुकीच्या वेळेला किंवा अति प्रमाणात गोड खाल्ल्यास त्याचे दुष्परिणामही होऊ शकतात. त्यामुळे गोड खाण्याची योग्य वेळ समजून घेणं गरजेचं आहे. (best time to eat sweets ayurveda guide)
गोड खाण्याची योग्य वेळ कोणती?
अन्नाचा शरीरावर होणारा परिणाम हा त्याच्या वेळेवरही अवलंबून असतो. योग्य वेळेत घेतलेला आहार औषधासारखा काम करतो. गोड पदार्थही याला अपवाद नाहीत. योग्य वेळी गोड खाल्ल्यास शरीराला ऊर्जा मिळते, पचन सुधारतं आणि मन शांत राहतं.
जेवणापूर्वी की जेवणानंतर गोड खावं?
अनेकांना जेवणानंतर गोड खाण्याची सवय असते. पण आयुर्वेदानुसार गोड पदार्थ जेवणाच्या सुरुवातीला किंवा आधी खाणं अधिक योग्य मानलं जातं. कारण असे केल्यास गोड पदार्थ आधी खाल्ल्यास ते सहज पचतात, पचनक्रिया सुरळीत राहते आणि शरीराला लगेच ऊर्जा मिळते. याउलट, जेवणानंतर गोड खाल्ल्यास पचनावर ताण येऊ शकतो आणि शरीरात जडपणा वाढू शकतो.
गोड खाण्याचे फायदे:
१. त्वरित ऊर्जा मिळते
२. मन प्रसन्न ठेवते
३. पचन सुधारण्यास मदत
गोड खाताना घ्यावयाची काळजी : कधीही मर्यादित प्रमाणातच गोड खा. रोज जास्त प्रमाणात गोड खाणं टाळा व मधुमेह किंवा पचनाचे त्रास असल्यास विशेष काळजी घ्या. अति गोड खाल्ल्यास वजन वाढ, आळस, सूज आणि इतर समस्या उद्भवू शकतात. गोड पदार्थ पूर्णपणे टाळण्यापेक्षा योग्य वेळ आणि प्रमाण यावर लक्ष देणं अधिक महत्त्वाचं आहे. जर तुम्ही गोड पदार्थ जेवणाच्या आधी आणि मर्यादित प्रमाणात खाल्ले, तर ते शरीरासाठी फायदेशीर ठरू शकतात.
Comments are closed.