Nonveg Food : उन्हाळ्यात चिकन की मटण पचण्यास हलकं?
देशभरात उन्हाच्या झळा जाणवत आहेत. या वाढत्या उष्णतेत आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या मते, या दिवसांमध्ये सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करणे गरजेचे असते. पण, नॉनव्हेज लव्हर्संना या दिवसात एक प्रश्न कायम पडतो की, चिकन की मटण खाणं योग्य आहे? अनेक जणांच्या मते चिकन लिन प्रोटीन असल्यामुळे ते पचण्यास हलके असते. यामुळे शरीरात कमी उष्णता निर्माण होते. तर मटण पचायला जड असल्याने ते खाणे टाळले जाते. तज्ज्ञांच्या चिकन की मटण खाणं हे त्याच्या शिजवण्याच्या पद्धतीवर आणि प्रकृतीवर अवलंबून असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला उन्हाळ्यात चिकन की मटण खावे? दोन्ही पदार्थं शिजवण्याची योग्य पद्धत काय? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
चिकन की मटण ?
- चिकन पांढरे मांस आहे तर मटण लाल मांस म्हणून ओळखले जाते. पांढऱ्या मांसामध्ये चरबीचे प्रमाण तुलनेने कमी असते तर लाल मांसात सॅच्युरेटेड फॅट जास्त असतात. जास्त फॅट असल्याने आळस, जडपणा आणि घाम जास्त येणे अशा तक्रारी वाढू शकतात.
- चिकन मटणाच्या तुलनेत हलके आणि पटकन पचण्यासारखे आहे. मटण खाल्ल्यानंतर पचण्यास जास्त वेळ लागतो. त्यामुळे या दिवसात नॉनवेज खायची इच्छा झाल्यास चिकन खावे.
- मटण हिट वाढवणारे अन्न मानले जाते, त्यामुळे शरीरात अधिक उष्णता वाढू शकते. तर चिकन या तुलनेने कमी उष्णता निर्माण करते.
- उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी चिकन खाण्याचा सल्ला दिला जातो.
- वजन कमी करणाऱ्या व्यक्तींनी आहारात मटण खाण्याऐवजी चिकन खावे. यामुळे स्नायूंची बांधणी उत्तम राहते.
शिजवण्याची योग्य पद्धत –
- कोणताही मांसाहारी पदार्थ आणल्यानंतर ते सगळ्यात आधी व्यवस्थितीत स्वच्छ करून घ्यावे.
- चिकन शिजवताना त्यात जास्त प्रमाणात तेलाचा वापर करू नये.
- चिकन शिजवण्याआधी दही, पुदिनासारख्या थंड पदार्थांचा वापर करावा, यामुळे पदार्थांतील उष्णता काही प्रमाणात कमी होते.
- उन्हाळ्यात मटण खावे टाळावे. जर खायचे असल्यास कुकरमध्ये आधी वाफेवर शिजवून घ्यावे आणि कमी तेल, तिखट वापरावे.
टीप – वरील माहिती केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
हेही वाचा – Health Care: हवं तेव्हा गोड खाता? आयुर्वेदानुसार जाणून घ्या योग्य वेळ
Comments are closed.