Helmet Expiry Date: एक हेल्मेट किती वर्ष वापरायचं? जाणून घ्या बदलण्याची वेळ




हेल्मेट


दुचाकी चालवताना हेल्मेट वापरणे आवश्यक असते. यामुळे अपघात झाल्यास डोक्याला गंभीर दुखापतीपासून वाचवण्यास मदत होते. काही लोक हेल्मेट घालणे टाळतात तर काही आवर्जून वाहतुकीचा हा नियम फॉलो करतात. परंतू अनेकदा हेल्मेटची गुणवत्ता, योग्य फिटिंग, टिकाऊपणा आणि त्याची एक्सपायरी याकडे दुर्लक्ष होते. नकळत या सर्व गोष्टींकडे लक्ष दिले जात नाही आणि ही चूक महागात पडते. सुरक्षित प्रवासासाठी उत्तम दर्जाच्या हेल्मेटसह त्याची एक्सपायरी माहीत असणे आवश्यक आहे. आज आपण  हेल्मेटची एक्सपायरी किती असते? किती वर्ष एक हेल्मेट वापरणे योग्य आहे जाणून घेऊयात

हेल्मेट उत्पादकांच्या मते, हेल्मेटची सरासरी लाईफ 3 ते 5 वर्ष इतकी आहे. हेल्मेटच्या आतमध्ये उत्पादनाची तारीख (उत्पादन तारीख) असते तेथून पुढे 3 ते 5 वर्ष मोजून बदलावे. जर हेल्मेट जोरात आपटले असेल किंवा त्याचा अपघात झाला असेल तर ते ताबडतोब बदलणे आवश्यक आहे, कारण अशा हेल्मेटचा आतील भाग कमकुवत झालेला असण्याची दाट शक्यता असते. जर अपघात झाला नसेल तरी उत्पादकांच्या मते हेल्मेटच्या आतील कडक फोम ऊन, घाम आणि धुळीमुळे कमकुवत होतो. त्यामुळे हेल्मेट वेळेत बदलणे आवश्यक आहे.

महत्त्वाच्या गोष्टी –

  • हेल्मेटच्या आतल्या बाजूला EPS पांढऱ्या रंगाचा फोमसारखा एक थर असतो. हा थर जेव्हा अपघात होतो तेव्हा डोक्याला बसणारा आघात यापासून संरक्षण करतो. पण हेल्मेटचा वारंवार वापर झाल्याने कालांतराने घाम, केसांतील तेल आणि ऊन यामुळे फोम कडक होतो किंवा त्याची झीज होते.
  • वारंवार वापरामुळे हेल्मेटची फिटिंग सैल होऊ शकते. जर हेल्मेट डोक्यावर योग्य प्रकारे बसत नसेल तर वेळेतच बदलून घ्यावे.
  • जर हेल्मेटच्या बाह्यभागावर कोणत्याही प्रकारच्या स्क्रॅचेस असतील तर बदलण्याची वेळ आली असे समजावे.
  • हेल्मेट ISI प्रमाणित हेल्मेट खरेदी करावे.
  • रस्त्यांवर मिळणारी स्वस्त हेल्मेट वापरू नयेत. त्याचा दर्जा उत्तम असेलच याची खात्री नसते.

तुमच्या प्रवास सुरक्षित होण्यासाठी वाहतुकीच्या नियंमासह हेल्मेट वापरण्याचे हे नियम लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

हेही वाचा – Planter Ideas : जुनी मातीची भांडी फेकू नका! DIY आयडियांनी बनवा सुंदर कुंड्या



Comments are closed.