Hanuman Jayanti 2026: यंदा हनुमान जयंतीला अशी करा मारुतीरायाची उपासना
चैत्र महिन्यात रामनवमीनंतर काही दिवसांनी हनुमान जयंतीचा उत्सव साजरा केला जातो. पंचांगानुसार हनुमान जयंतीचा उत्सव दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो.हिंदू धर्मात हनुमानाला कलियुगातील देव मानले जाते. हनुमान जयंतीच्या दिवशी उपवास करून योग्य विधीनुसार पूजा केल्याने सर्व त्रास दूर होतात आणि ग्रह-नक्षत्रांचे शुभ फळ देखील मिळते. तसेच कोणत्याही समस्येपासून मुक्तता मिळणे असो किंवा भूत आणि नकारात्मक शक्तींपासून मुक्तता मिळणे असो, संकटमोचन हनुमान त्यांच्या भक्तांच्या प्रत्येक समस्येचे निराकरण करतात, अशी धार्मिक मान्यता आहे. या वर्षीच्या हनुमान जयंतीची तिथी, शुभ मुहूर्त आणि पूजा पद्धत जाणून घेऊया.. ( Hanuman Jayanti 2026 Date And Time In Marathi )
यंदा हनुमान जयंती कधी?
यंदा हनुमान जयंती गुरुवार, २ एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे. पंचांगानुसार, पौर्णिमेची सुरुवात 1 एप्रिल रोजी सकाळी 07 वाजून 06 मिनिटांनी होत आहे तर 2 एप्रिल रोजी सकाळी 07 वाजून 41 मिनिटांनी संपणार आहे. उदयतिथीनुसार चैत्र पौर्णिमा गुरुवार, 2 एप्रिल रोजी आहे त्यामुळे हनुमान जयंती देखील या दिवशी असणार आहे. हनुमान जयंती ‘हनुमंतोत्सव’ म्हणूनही ओळखली जाते.
पूजेचा शुभ मुहूर्त
पौराणिक कथेनुसार, भगवान हनुमानाचा जन्म चैत्र पौर्णिमेच्या दिवशी पहाटे सूर्योदयाच्या वेळी झाला होता. त्यामुळे २ एप्रिल रोजी हनुमान जयंतीच्या पूजेसाठी सकाळची शुभ वेळ 06 वाजून 10 मिनिटांपासून ते 07 वाजून 44 मिनिटांपर्यंत असणार आहे. जर काही कारणास्तव सकाळी पूजा करणे शक्य नसल्यास तुम्ही सायंकाळी 06 वाजून 39 मिनिटांपासून ते 08 वाजून 06 मिनिटांच्या वेळेत पूजा करू शकता.
हनुमान जयंतीचे महत्त्व
भगवान रामाचे भक्त असलेल्या हनुमानाची जयंती हनुमान जयंती म्हणून साजरी केली जाते. शक्ती, श्रद्धा, धैर्य आणि भक्तीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या मारूतीरायाचा जन्म चैत्र महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी झाला. शास्त्रांनुसार, हनुमानाची पूजा करणाऱ्या भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. तसेच, भूत आणि नकारात्मक शक्तींचा अंत होतो. या दिवशी हनुमान चालीसा किंवा सुंदरकांड पठण करणे खूप फायदेशीर आहे. तसेच, हनुमानजींची पूजा केल्याने कुंडलीत मंगळाची स्थिती अधिक मजबूत होते.
हनुमान जयंती पूजाविधी
- सकाळी लाल किंवा नारंगी कपडे घालून उपवास करा.
- जर घरीच पूजा करत असाल तर एका ठिकाणी चौरंग ठेवून गंगाजलाने जागा शुद्ध करा.
- त्यानंतर लाल कापड घालून चौरंगावर भगवान हनुमानाची मूर्ती किंवा चित्र ठेवा. तसेच भगवान राम आणि माता सीता यांचे चित्रेही ठेवा.
- हनुमानजींना सिंदूर, तुळशीची पाने, लाल फुले अर्पण करा आणि बुंदीच्या लाडूचा नैवेद्य दाखवा. धूप लावा.
- त्यानंतर हनुमान चालीसा आणि सुंदरकांड पठण करा.
- नंतर तुपाचा दिवा आणि कापूर लावून हनुमानजीची आरती करा आणि प्रसाद ग्रहण करा.
- शक्य असल्यास हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घ्या.
Comments are closed.