Ragi Benefits : उन्हाळ्यात नाचणी का खावी?
वाढत्या उष्णतेत पचायला हलके आणि शरीराला थंडावा देणारे पदार्थ खावेत असा सल्ला तज्ज्ञमंडळी देतात. यासाठी रसाळ फळे, भरपूर पाणी, सरबतस भाज्या अशा पदार्थांचा आहारात समावेश करण्यात येतो. या पदार्थांसोबत तुम्ही उन्हाळ्यात नाचणीचा देखील आहारात समावेश करायला हवा. पारंपरिक भारतीय आहारातील हा पौष्टिक घटक उन्हाळ्यात शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. (Benefits of eating ragi in summer)
नाचणी थंड असल्याने शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. उन्हामुळे येणारा थकवा, अशक्तपणा आणि डिहाड्रेशन कमी करण्यासाठी नाचणी उपयुक्त आहे. तसेच नाचणी पचायला हलकी असल्याने पोटावर ताण येत नाही. नाचणीत कॅल्शियम असते, जे हाडे मजबूत ठेवण्यासाठी उपयुक्त असते. त्यासोबत यातील फायबर पचनक्रिया सुधारते. पोट जास्त वेळ भरलेले राहावे असे वाटत असेल नाचणी अवश्य खावी. नाचणी खाल्ल्याने वारंवार भूक लागत नाही, ज्यामुळे वजनही वाढत नाही. आरोग्याप्रमाणे नाचणी त्वचेसाठीही फायदेशीर आहे. यातील ऍंटी-ऑक्सिंड्टस त्वचेला पोषण देतात.
कधी आणि कशी खावी?
नाचणी सकाळच्या नाश्त्यात किंवा दुपारच्या जेवणात खाऊ शकता. तुम्ही भाकरी, डोसा किंवा पेज अशा विविध प्रकारात नाचणीचा आहारात समावेश करू शकता.
एकदंरच, या दिवसात शरीर हायड्रेट राहण्यासाठी नाचणी हा उत्तम पर्याय आहे. यात विविध पोषणमूल्य असल्याने तुम्ही रोजच्या आहारात समावेश करायला हवा.
हेही वाचा – Health Tips: माठातील पाणी अमृतापेक्षा कमी नाही; जाणून घ्या आरोग्यदायी फायदे
Comments are closed.