Kitchen Tips: स्वयंपाकघरातील ‘या’ वस्तू वेळोवेळी बदलणे गरजेचे
स्वयंपाकघरात दररोज अनेक वस्तू वापरल्या जातात, त्यापैकी काही वस्तू सहजासहजी खराब होत नाहीत आणि दीर्घकाळ त्याचा वापर केला जातो. पण तुम्हाला माहित आहे का या वस्तूंचा दीर्घकाळ वापर आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. त्यामुळे या वस्तू ठराविक काळानंतर बदलणे गरजेचे असते. कारण सततच्या वापराने त्यावर जीवाणू वाढू शकतात.
प्लॅस्टिकच्या वस्तू
जर तुम्ही दररोज प्लॅस्टिकची भांडी, डबे, बाटल्या किंवा इतर वस्तू वापरत असाल तर दर ६ महिन्यांनी या वस्तू बदलणे महत्त्वाचे आहे. कारण जुन्या प्लॅस्टिकमधून सूक्ष्म कण अन्नात मिसळू शकतात. शिवाय गरम अन्न ठेवल्याने प्लॅस्टिकमधील रसायने अन्नामध्ये मिसळू शकतात, हे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. म्हणून दर ६-१२ महिन्यांनी प्लॅस्टिकच्या वस्तू बदलून घ्याव्या. शक्यतो स्टील किंवा काचेच्या वस्तू वापराव्यात.
स्वयंपाकघर स्पंज
किचन स्पंज लवकर घाण, तेलकट होतात. तसेच स्पंज नेहमी ओला राहतो, ज्यामुळे जिवाणूंची वेगाने वाढ होते. म्हणून दर १-२ आठवड्यांनी ते बदलणे महत्त्वाचे आहे.
स्वयंपाकघर टॉवेल
किचन टॉवेल हे सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या वस्तूंपैकी एक आहेत आणि ते लवकर घाण होतात. स्वयंपाक करताना आपण या टॉवेलला हात पुसतो आणि ओलाव्यामुळे त्यात जिवाणूंची वाढ होते. त्यामुळे दर २-३ दिवसांनी टॉवेल धुणे आणि दर ६-८ महिन्यांनी ते बदलणे महत्त्वाचे आहे.
हेही वाचा: Hygiene Tips: पहिल्यांदा वापरण्यापूर्वी स्वच्छ धुवाव्यात ‘या’ वस्तू
चॉपिंग बोर्ड
चॉपिंग बोर्ड हे भाज्या, फळे कापण्यासाठी वापरले जाते. ते ठराविक काळाने बदलण्याची गरज असते, विशेषतः जेव्हा त्यावर ओरखडे किंवा भेगा पडतात. त्यातही लाकडाचा चॉपिंग बोर्ड असल्यास तो दर ६ महिन्यांनी बदलणे गरजेचे आहे.
स्टीलच्या चाळण्या आणि गाळण्या
स्टीलच्या चाळण्या आणि गाळण्या या अनेक कामांसाठी वापरल्या जातात. त्या टिकाऊ असतात पण ठराविक काळाने बदलण्याची गरज असते. विशषतः चहाची गाळणी दर ३ महिन्यांनी बदलावी.
Comments are closed.