Gold limit at home : घरात किती तोळं सोनं ठेवता येतं? समजून घ्या नियम, मर्यादा
भारतामध्ये सोने हे केवळ दागिना नसून सुरक्षित गुंतवणुकीचं प्रतीक मानलं जातं. लग्नसमारंभ, सण किंवा बचतीसाठी अनेक कुटुंबे मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करतात. मात्र, वाढत्या सोन्याच्या किमती आणि व्यवहारांमुळे घरात किती सोने ठेवता येतं आणि त्यावर काय नियम लागू होतात, याची माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. (gold limit at home india income tax rules)
घरात किती सोनं ठेवता येतं?
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कायद्यानुसार घरात सोनं ठेवण्यावर कोणतीही ठराविक मर्यादा नाही. म्हणजेच, तुम्ही कितीही सोनं (दागिने, बिस्किट, नाणी) बाळगू शकता. पण एक अट महत्त्वाची आहे त्या सोन्याचा कायदेशीर स्रोत (Source of Income) तुम्हाला दाखवता आला पाहिजे.
छाप्यावेळी काय नियम लागू होतात?
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (CBDT) ने 11 मे 1994 रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, आयकर विभागाच्या छाप्यावेळी काही प्रमाणात सोनं जप्त न करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
या मर्यादा अशा आहेत:
विवाहित महिला – ५०० ग्रॅमपर्यंत
अविवाहित महिला – २५० ग्रॅमपर्यंत
पुरुष (प्रति व्यक्ती) – १०० ग्रॅमपर्यंत
या मर्यादेतील सोन्याचे दागिने सामान्यतः जप्त केले जात नाहीत.
ही मर्यादा म्हणजेच कायदेशीर मर्यादा आहे का?
नाही. ही मर्यादा म्हणजे सोनं ठेवण्याची कमाल मर्यादा नाही, तर फक्त छाप्यावेळी जप्त न करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे आहेत. जर तुमच्याकडे यापेक्षा जास्त सोनं असेल आणि त्याचा योग्य पुरावा (इनव्हॉइस, रिटर्न, इ.) असेल, तर तेही कायदेशीर ठरू शकतं.
कोणत्या सोन्यावर नियम लागू होतात?
हे परिपत्रक प्रामुख्याने सोन्याच्या दागिन्यांवर लागू होतं. दागिने समाविष्ट सोन्याची नाणी / बिस्किटे स्वतंत्र तपासणी होऊ शकते तर हिरे आणि इतर मौल्यवान वस्तू वेगळ्या नियमांनुसार तपासल्या जातात.
वारसाहक्काने किंवा भेट मिळालेलं सोनं
जर तुम्हाला सोने वारसाहक्काने किंवा भेट स्वरूपात मिळालं असेल, तर:मृत्युपत्र (Will), इन्कम टॅक्स रिटर्न, वेल्थ टॅक्स संबंधित कागदपत्रे अशा पुराव्यांमुळे जास्त प्रमाणातील सोनंही कायदेशीर ठरू शकतं.
कधी होऊ शकते कारवाई जर तुमच्याकडे सोन्याचा स्त्रोत स्पष्ट नसतील, खरेदीचे बिल किंवा पुरावे नसतील किंवा उत्पन्नाच्या तुलनेत जास्त सोनं आढळल्यास अशावेळी तपास, दंड किंवा जप्तीची कारवाई होऊ शकते.
घरात सोनं ठेवण्यावर थेट मर्यादा नसली तरी पारदर्शकता आणि कागदोपत्री पुरावे अत्यंत महत्त्वाचे आहेत. योग्य नियमांची माहिती आणि काळजी घेतल्यास तुम्ही कोणत्याही अडचणीशिवाय सोन्यात गुंतवणूक करू शकता.
Comments are closed.