Menstruation Cycle : कमी वयात मासिक पाळी येण्याची कारणे आणि परिणाम

मुलींमध्ये मासिक पाळी येण्याचे विशिष्ट वय असते. या वयात मासिक पाळी आली तर त्याला आपण नैसर्गिक चक्र असे म्हणतो. पूर्वी मुलींना 13 ते 14 वर्षानंतर पाळी सुरू होत असे आज ती वयोमर्यादा खूप कमी झाली आहे. मात्र, सध्या मासिक पाळी येण्याचं प्रमाण घटत असून कित्येक मुलींना वयाच्या 10 व्या वर्षी पाळी येत आहे. तज्ज्ञांच्या मते वातावरणातील बदल, बाहेरचे जंकफूड, शरीरात आलेला स्थूलपणा, कमी वयात शरीरसंबंध अशी अनेक कारणे यामागे आहेत.

बदलत्या काळानुसार महिलांमध्ये अनेक शारीरिक आणि मानसिक बदल मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. वाढती जबाबदारी, कामाचा ताण यामुळे महिलांची तारेवरची कसरत सुरू आहे. यात कामावर जाणारी स्त्री असो वा साधी गृहिणी, शाळा-कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुली असो. सर्वच वयोगटातील महिलेच्या आरोग्यावर याचा परिणाम होत आहे. त्यातीलच एक समस्या कमी वयात मासिक पाळी येणे. आजच्या लेखात आपण मुलींमध्ये कमी वयात मासिक पाळी येण्याची कारणे कोणती आहेत त्याचे परिणाम त्यांच्या शरीरावर काय होतात, हे जाणून घेऊयात.

कारणे –

लठ्ठपणा – शरीरातील चरबीचे प्रमाण (BMI) वाढल्यामुळे हार्मोन्समध्ये बदल होऊन पाळी लवकर येते.

चुकीचा आहार – फास्ट फूड, प्रक्रिया केलेल अन्न आणि गोड पेयांचे अतिप्रमाणात सेवन करणे.

लाईफस्टाईल – हल्ली मुली जास्त वेळ मोबाईल पाहण्यात घालवतात. ज्यामुळे त्या एकाच जागी बसून राहतात. स्क्रीनच्या सततच्या वापरामुळे फ्लॅशिंग लाईट्स मेंदूवर परिणाम करते. यामुळे मेलाटोनिनसारखे हार्मोन्स असुंतलित होतात आणि पाळी लवकर येते.

मानसिक ताण – अभ्यास किंवा अन्य कारणांमुळे लहान वयातच मानसिक ताण वाढतो. मानसिक ताणामुळे मुलींना पाळी लवकर येण्यास सुरूवात होते.

परिणाम –

  • मासिक पाळी कमी वयात आल्याने वाढ लवकर थांबते आणि मुलींची उंची वाढण्यात अडथळे निर्माण होतात.
  • भविष्यात रक्तदाब, मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका निर्माण होतो.
  • कमी वयात मासिक पाळी आल्यावर वयानुसार परिपक्वता निर्माण होत नाही. ज्यामुळे मानसिक तणाव, न्यूनगंड निर्माण होतो.

काळजी कशी घ्यावी?

  • मुलींनी दररोज किमान तासभर मैदानी खेळ खेळण्यास प्रवृत्त करावे.
  • घरातील पौष्टिक आहार द्यावा आणि बाहेरचे खाणे टाळावे.
  • प्लॅस्टिकच्या भांड्यांचा वापर कमी करावा.
  • स्क्रीन टाईम (मोबाईल/टीव्ही) कमी करावा.
  • पाळी लवकर आल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

टीप – वरिल माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे. अधिक सल्ल्यांसाठी तज्ज्ञांची मदत घ्यावी.

हेही वाचा – Vaginal Dryness : व्हजायनल ड्रायनेसची कारणे कोणती?

Comments are closed.