Kolhapur Jotiba : जोतिबाच्या नावानं चांगभलं, कोल्हापूरचा डोंगर दुमदुमला
कोल्हापूर : दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या चैत्र पौर्णिमा यात्रेच्या निमित्ताने अवघा जोतिबा डोंगर ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषाने दुमदुमला. महाराष्ट्र, कर्नाटकसह देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वाडी रत्नागिरी येथे चैत्र यात्रेचा मुख्य सोहळा अत्यंत उत्साहात सुरू झाला. अनेक गावातून मानाच्या काठ्या या जोतिबाच्या डोंगरवर पोहोचण्यास सुरुवात झाली आहे.
Comments are closed.