थंड पाणी पिण्याचे दुष्परिणाम

आपल्या शरीरात ६० ते ७०% पाणी असते. यामुळे निरोगी आरोग्यासाठी पाणी फार महत्वाचे आहे. म्हणूनच पाण्याला जीवन असे म्हणतात. पण तुम्हाला माहीत आहे का पाणी निसर्गात थंड प्रवृत्तीचे आहे. पण हेच पाणी तुम्ही गरम केल्यास किंवा अतिथंड करून पिल्यास त्याचे शरीरावर दुष्परिणाम होतात.

सर्दी आणि खोकला
थंड पाणी प्यायल्याने अनेकांना सर्दी आणि खोकला होतो. छातीत कफ साचू लागतो.

सांधेदुखी
थंड पाणी पिल्यास सांधेदुखीचा त्रास सुरू होतो. सांध्यांमधील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ज्यामुळे सांध्यांना सूज येते व वेदना होतात.

पचनक्रिया
थंड पाणी पिल्यास पचनक्रिया मंदावते. त्यामुळे अन्न पचायला वेळ लागतो आणि अपचन, गॅस, ॲसिडिटी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

डोकेदुखी
थंड पाणी प्यायल्याने डोक दुखू लागते. कारण थंड पाणी पिल्यास रक्तवाहीन्या आकुंचन पावतात त्यामुळे मेंदूला रक्तपुरवठा संथगतीने होतो. परिणामी डोकेदुखी सुरू होते.

घसा खवखवणे
थंड पाणी प्यायल्याने अनेकांना घसा खवखवण्याचा त्रास होतो. थंड पाण्याचा परिणाम घशातील रक्तवाहिन्यांवर होतो. त्या आकुंचन पावतात परिणामी घसा दुखू लागतो व खवखवतो.

हृदय
थंड पाणी प्यायल्याने हृदयावर ताण येतो. त्यामुळे त्याची गती कमी होते. यामुळे हृदयाशी संबंधित त्रास होतो.

ऊर्जा
थंड पाणी प्यायल्याने शरीरातील ऊर्जा कमी होते. थंड पाणी प्यायल्याने शरीरातील चयापचय क्रिया मंदावते, ज्यामुळे शरीराला ऊर्जा कमी मिळते.

Comments are closed.