Dehydration : डिहायड्रेशन म्हणजे काय?




डिहायड्रेशन


उन्हाळा सुरू झाला की “शरीर हायड्रेट ठेवा”, “डिहायड्रेट होऊ देऊ नका” अशी वाक्य कायम कानावर पडतात. डॉक्टरही शरीर हायड्रेट राहण्यासाठी ताजी फळे, भरपूर पाणी, भाज्या खाण्याचा सल्ला देतात, जेणेकरून उन्हाच्या तीव्रतेचा परिणाम शरीरावर होणार नाही. परंतू, उन्हाळ्यात वारंवार वापरला जाणारा हा शब्द म्हणजे नेमका काय? शरीर डिहायड्रेट होणे म्हणजे नेमके काय? आजच्या लेखात आपण डिहायड्रेशन म्हणजे काय त्यावरील उपाय आणि लक्षणे जाणून घेणार आहोत.

डिहायड्रेशन –

प्यायलेल्या पाण्याच्या प्रमाणापेक्षा शरीरातून अधिक पाणी गमावणे या स्थितीला शरीरातील पाणी कमी होणे किंवा ‘डिहायड्रेशन’ होणे असे म्हणतात. थोडक्यात सांगायचे झाल्यास ‘डिहायड्रेशन’ किंवा ‘निर्जलीकरण’ म्हणजेच शरीरातील पाण्याची पातळी कमी होणे. जेव्हा शरीरात योग्य प्रमाणात पाणी नसते तेव्हा त्याचा परिणाम रक्ताभिसरण, पेशींच्या कार्यावर होतो. ज्यामुळे अनेक आजार होण्याचा धोका निर्माण होतो.

डिहायड्रेशनची लक्षणे

  • घशाला कोरड पडणे
  • सतत तहान लागणे
  • डोके किंवा अंगदुखी
  • लघवी कमी प्रमाणात होणे
  • पिवळी लघवी होणे
  • त्वचा कोरडी पडणे
  • मलावरोध होणे
  • चक्कर येणे
  • अशक्तपणा
  • रक्तदाब कमी होणे
  • वजन झपाट्याने कमी होणे

उपाय

  • सतत पाणी प्यावे. दिवसातून कमीत कमी 8 ते 10 ग्लास पाणी पिणे.
  • उन्हाळ्यात नियमित ताज्या फळांचा रस पिणे.
  • दिवसातून एकदा लिंबू किंवा नारळपाणी पिणे.
  • कलिंगड, द्राक्ष, डाळिंब, आवळा, स्ट्रॉबेरी अशा फळांचे सेवन करावे.
  • काकडी, कांदा, टोमॅटो, पालक, मुळा, गाजक अशा भाज्यांचा आहारात समावेश करणे.
  • शरीरातील पाण्याची कमतरता भरुन काढण्यासाठी दही किंवा ताकाचा आहारात समावेश करावा.

हेही वाचा – थंड पाणी पिण्याचे दुष्परिणाम



Comments are closed.