घराच्या सेफ्टीसाठी ‘स्मार्ट लॉक’

आजच्या डिजिटल जमान्यात अभ्यासापासून ते बँकेतील कामांपर्यंत सगळच डिजिटल झालं आहे. याचपार्श्वभूमीवर आता बंगले, मोठ्या टाऊनशिपमधील घरांना चोर, भामट्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी पारंपरिक कुलूपांऐवजी स्मार्ट लॉक म्हणजेच इलेक्ट्रीक लॉक लावली जात आहेत. त्यामुळे घर तर सुरक्षित राहतेच शिवाय चावी हरवण्याचे टेन्शन नसते. यामुळे गेल्या काही वर्षात स्मार्ट होम लॉकला लोकांची पसंती मिळत आहे.

हे स्मार्ट लॉक म्हणजे इलेक्ट्रीक कुलुप आहे.

जे चावी ऐवजी स्मार्टफोन अॅप, फींगर प्रिंट, कोड नंबर किंवा आवाज ओळखून उघड-बंद होते.

त्यासाठी तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमध्ये हे अॅप इन्स्टॉल करावे लागते.

त्यासाठी इंटरनेटची गरज असते.

जर तुम्हीही हे लॉक वापरत असाल किंवा नवीन विकत घेणार असाल तर असे लॉक खरेदी करा ज्यात फिंगर प्रिंट, की बोर्ड आणि मॅकेनिकल चावीचेही ऑप्शन असेल.

त्यामुळे एखाद्या कठीण प्रसंगात तुम्हाला घरात प्रवेश करण्यात कोणतीही अडचण येणार नाही.

 

Comments are closed.