एलिंगट लूकसाठी क्लच बॅग्ज
एखाद्या कार्यक्रमाला जाताना तुम्ही पारंपारिक साडी जरी नेसलात किंवा वेस्ट्रर्न ड्रेस जरी कॅरी केलात तरी पर्सविना तुमचा लूक पूर्णच होऊ शकत नाही. यामुळे महिला ,तरुणी वेगवेगळ्या ड्रेसेस आणि साडीवर मॅच होतील अशा स्टायलिश पर्सेस, बॅग्ज घेत असतात. पण खरं तर देशी किंवा वेस्टर्न ड्रेसेसवर क्लच उठून दिसतात. त्यामुळे साडी किंवा ड्रेस जरी तुम्ही कॅरी कराल तेव्हा त्यावर वेगवेगळे पर्सेस घेण्याची गरज नसते. क्लच तुम्हाला कम्प्लिट लूक देतो. त्यानुसार आता बाजारातही वेगवेगळ्या प्रकारचे क्लच परवडणाऱ्या किंमतीत सहज उपलब्ध होतात.
धातूचा घट्ट पकड
मॅटेलिक क्लचवर वेगवेगळ्या धातुचा मुलामा लावलेला असतो. यात गोल्डन, सिल्वर, कॉपरच नाही तर ऑ्क्सिडाईज धातू देखील वापरला जातो. सुंदर बारीक पारंपारिक नक्षीकाम कोरून हे क्लच बनवले जातात. त्यामुळे फक्त भारतीयच पेहराव नाही तर तुम्ही गाऊन ड्रेसवरही क्लच कॅरी करू शकता.
सिल्क एम्ब्रॉयडरी क्लच
सिल्कचे कव्हर असलेले हे एम्ब्रॉयडर्ड क्लच सिल्क साडी, सिल्क ड्रेसेसवर छान दिसतात. याचा आकार एखाद्या पाकिटासारखा असतो. त्यामुळे याला इनवलप क्लच असेही म्हणतात.
अनुक्रमित क्लच
या टाईपचे क्लच पार्टी, बर्थ डे, गेट टुगेदर ड्रेसिंगवर शोभून दिसतात. मीडी, मिनी ड्रेसेसवर हे क्लच शोभून दिसतात.
भरतकाम केलेले क्लच
जर तुम्हाला कॉटन साडी किंवा ड्रेसेस वर ट्रेडिशनल लूकसाठी पर्स हवी असेल तर ही कॉटन एम्ब्रॉयडर्ड क्लच नक्की ट्राय करा. लोकरी धाग्यांनी रंगीबंरेगी रंगसंगतीचा हा क्लच तुम्हाला कमप्लिट लूक देतो.
मणी क्लच
सिल्क आणि कॉटन क्लच प्रमाणेच बीड्स म्हणजेच रंगीबेरंगी मण्यांनी सजवलेले क्लचही बाजारात मिळतात. डिझायनर साडी किंवा ड्रेसेस लेहंग्यावर हे क्लच क्लासी लूक देतात.
Comments are closed.